________________
(४६९)
कर्म के कारज वन आय ताको भाई एक उपाय,
निजातम परिणति देख यही कोटि शास्त्रनि को लेख ३३५
शुद्ध
जर कर्मानवाचे आगमन थांबले तर आपले सर्व कार्यच सिद्ध झाले. आणि त्यासाठी एक उपाय आहे की आपल्या आत्म्याची शुद्ध परिणती पाहत राहणे. हेच सर्व शाखात सांगितले आहे. कारण "निज स्वरूप मे तीनता ही निश्चयरूप संबर है ३३६ व्यवहार दृष्टीने आस्रव निरोधाचे अनेक भेद-प्रभेद यांना संवर म्हटले आहे.
1
ज्ञान व वैराग्यमय चिंतन करून मन-वचन काया यांना संयमित करतात आणि आपल्या आत्म्यात स्थिर होतात. ती संवर भावना होय २२७
पंडित दौलतरामजींनी संवर भावना पदात लिहिले आहे "जिन पुण्य पाप नहीं कीना, आतम अनुभव चित्त दीना ।" "तिन ही विधि आवत रोके, संवर लहि सुख अवलोक ३३८ ॥१०॥
नवसान
ज्यांनी पुण्य अर्थात शुभ भाव आणि पाप अर्थात अशुभ भाव आणते नाहीत, फक्त आत्म्याच्या अनुभवाचे चिंतन केले त्यातच चित्त लावले, त्यांनीच येणाऱ्या कर्मांना लगाम लावला आणि संबर प्राप्त करून सुखाचा साक्षात्कार केला.
इथे शुभ-अशुभ दोन्ही प्रकारच्या भावनेला बंधनाचे कारण मानले आहे. म्हणून सम्यग्दृष्टी जीव स्वद्रव्याच्या आलंबनाने जितकी शुद्धता करतात तेवढ्या प्रमाणात त्यांचे संबर होते. पुढे क्रमशः शुद्धता वाढवून पूर्ण शुद्धता प्राप्त करतात. हे संघर आहे असे विवेचन केले आहे.
आत्मानुभवाची भावना करणे म्हणजेच बास्तबिक संबर भावना आहे. वरील श्लोकाचा असाच भावार्थ आहे. आत्मानुभव ज्ञानाने प्राप्त होईल. "समयसार कलश" यात १२९ व्या ओवीमध्ये आचार्य अमृतचंद्र यांनी सुद्धा याच भावनेला व्यक्त केले आहे. ते लिहितात, शुद्धात्म तत्त्वाच्या उपलब्धीमुळे साक्षात् संवर प्राप्त होतो. आणि शुद्धात्मतत्त्वाची उपलब्धी भेद-विज्ञानामुळेच होऊ शकते, म्हणून भेद विज्ञानाची भावना करणे योग्य आहे. भेद-विज्ञान जाणल्यामुळे रागद्वेष मोह गळून जातात. आणि दुष्कर्मांचे आगमन थांबते.
आधुनिक लेखकामध्ये डॉ. हुकुमचन्द भारिल्ल यांनी संवर भावनेच्या चार पदांमध्ये भेदविज्ञानाचे वर्णन केले आहे. तसे भेद - विज्ञानाचे वर्णन अन्यत्व भावनेत केले आहे.