________________
संवर भावनेत तर आसवांचा पूर्णतः निरोध करणे मुख्य ध्येय आहे. ते कसे करावे, कसे अडवावे, असे चिंतन संवर भावनेत असल्यामुळे आस्रव आणि संवर भेदांचे चिंतन संवर भावनेसंबंधी अनेकांनी लिहिले आहे. शेवटी प्रत्येक धार्मिक अनुष्ठानाचे लक्ष्य तर भेद विज्ञान आहे. कारण भेद-विज्ञान झाल्याशिवाय शरीर व आत्मा भिन्न आहेत हे ज्ञान होणारच नाही. या भेदविज्ञानाला जाणल्याशिवाय धर्मक्रियामध्ये भावोद्रक येणार नाही. भेदविज्ञानसहित संवर तत्त्वाच्या भेद प्रभेदांचे चिंतन केले जाऊ शकते. संवर भावनेचे विवेचन करताना डॉ. हुकमचंद भारिल्ल लिहितात- "धर्माचा आरंभ संवरानेच होतो. कारण की, मिथ्यात्व नामक महापापाचा निरोधक मिथ्या ज्ञानांधकाराचा नाशक व अनन्तानुबन्धी कषायाचा विनाश संवरानेच होऊ शकतो."
बा मिथ्यात्व अज्ञान व असंयम आम्नव भाव आहे, रागभाव आहे. त्यांच्या अभावाने होणारा वीतरागभाव संवर आहे. संवरच युक्तिमार्गाचा आरंभिक प्रवेशद्वार आहे. संवराची प्राप्ती भेदविज्ञान जाणल्याने होते. आत्मानुभूतीच्या काळातच होते. म्हणून संवर भावनेत भेद-विज्ञान व आत्मानुभूतीची भावना मुख्य आहे.३३९
संवर भावनेत मिथ्यात्वाला आवृत्त करण्यासाठी सम्यक्त्व, अव्रताचा निरोध करण्यासाठी व्रत इ.चा अनेक लेखकांनी प्रतिपादन केले आहे. याचे भेद ज्ञानीने आत्मानुभूतीपूर्वक चिंतन केल्याने मुक्तीचा अधिकारी बनतो. म्हणूनच पू. श्रीतिलोकऋषीजी महाराज म्हणतात -
संवर मारग तारक सांचो नवा कर्म सब टाले ।
हाट कपाट समान ए जाणो आगम साख देखाले रे ।३४० संवर मार्गानेच संसारातून तरूण जाणे शक्य आहे. संवर असेल तर आस्रव कर्माचे आगमन आत्म्यात होणार नाही. ज्याप्रमाणे खिडकी उघडी असेल तर घरात धूळ-कचरा येईल. खिडकी बंद केली तर कर्मरूपी कचरा आत्म्यात येणार नाही. यात थोडीशी जरी गफलत झाली तर फार नुकसान होईल. हे अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी आवश्यक निर्युक्तीमधे एक गाथा आहे
अणथोवं वणथोवं, अग्गीथोवं कसायथोवंच ।
णहु मे वीससियव्यं, थोवंपिहुतं बहुं होई ।। अर्थात् थोडासा ऋण थोडासा व्रण (घाव) थोडा अग्नी आणि थोड्या कपाययांची या उपेक्षा करू नये. हे फार थोड्या कालावधीत विस्तृत होत जातात. संवर भावनेत