________________
सीजयसोम मनींनी परिपह संवर साधण्यासाठी प्रत्येक क्षणी समभावात राहण्याचे प्रतिपादन
आहे. तसे पाहिले तर बावीस परिषह जिंकण्यासाठी संक्षिप्त सारच सांगितले आहे. आंतरिक रोग नष्ट करण्याची एकमेव औषधी म्हणजे समभाव. हा रामबाण उपाय आहे.
यतिधर्माचे दहा प्रकार आहेत. किंतु त्याऐवजी श्रावकासाठी तीन मनोरथ करण्याची प्ररूपणा केली आहे. तसेच साधूसाठीसुद्धा तीन मनोरथ दिले आहेत. त्यात उल्लेख आहे - साधूने अशी अभिलाषा करावी की, गुरूकडून कधी मी शाखांचा, सूत्रांचा अभ्यास करीन ? आणि कधी एकाकी प्रतिमा (अभिग्रह) मध्ये राहून त्यात विशिष्ट संलेखना, काय संलेखना आणि कपाय संलेखना करीन. अर्थात् काया आणि कषाय यांना कधी क्षीण करीन.३३२
बारा भावनांत अनुप्रेक्षाच्या चिंतनाऐवजी यांनी संवरात सर्व जीवांचे हित चिंतन करण्याचे सांगितले आहे. त्यात जगातील सर्व जीवांना मित्र मानून कोणाशी वैर भाव करु नये, दोष करू नये. नेहमी सत्य वचन बोलावे. परधनावर कुदृष्टी ठेवू नये. असे चिंतन करण्यास प्रेरित केले आहे.३३३
काम वासनेचे लष्कर जेव्हा आक्रमण करते तेव्हा त्यावर अंकुश लावण्यासाठी शील-संयमाचे कवच घातल्याने कामवासनेने हल्ला केला तरी या कवचामुळे बचाव होतो. आणि भय परिणामस्वरूप हळूहळू सर्वच प्रकारच्या वासना-तृप्णा क्षीण होत जातात. मुनिश्री म्हणूनच म्हणतात की संवर भावनेत असेच चिंतन करावे की कधी मी या वासनांपासून पूर्णपणे मुक्त होईन ? कधी बाह्य-अंतर परिग्रहापासून माझी मुक्तता होईल?
हे वीर प्रभू ! ज्याप्रमाणे २२ परिषहांवर आपण विजय मिळवला तसेच मी यावर कधी विजय मिळवीन ? आपण तर देव, मनुष्यापासून मिळालेले उपसर्गांना धैर्याने तोंड दिले. मेरुपर्वतासारखे निश्चल राहिलात, किंचितही उद्विग्नता आपल्या मनात निर्माण झाली नाही. मनाच्या चलबिचल होणाऱ्या स्वभावावर संपूर्णपणे मालकी हक्कप्रस्थापित केली अन् त्याचमुळे आपण अक्षय मोक्षपदापर्यंत पोहोचलात. अशी धन्य वेळ माझी कधी येणार? अशाप्रकारे संवर भावनेत चिंतन केल्याने काय मिळते याचे विशद विश्लेषण केले आहे.३३४
श्रीजयसोम मुनींनी संवर भावनेचे अन्य लेखकांपेक्षा वेगळेच विवेचन केले आहे. कारण सवराचा अर्थच आहे की आवरण घालणे. कशाही प्रकारे येणाऱ्या कर्मांना आत्म्यापर्यंत येऊन द्यायचे नाही असा प्रयत्न करायाचा म्हणजे संवर. क्षुल्लक श्री मनाहरलाल वर्णी यांनी एका दोहामध्ये सांगितले आहे -