________________
२०) प्रज्ञा परिषह - आपल्या ज्ञानाचा, पांडित्याचा यत्किंचितही गर्व नसावा.
२१) अज्ञान परिषह - अध्ययन अभ्यास अप्रमत्त (आळस केला नाही) राहून सद्धा मी ज्ञान प्राप्त करू शकत नाही. पशूसारखा मूर्ख आहे. कसलेच ज्ञान नाही, असले आक्षेप, वचनांना शांतिपूर्वक सहन करूनही अद्याप ज्ञानातिशय झाले नाही. अशाप्रकारे स्वतःला हीन लेखू नये. दुःखी न होता प्रयत्नशील रहावे असे अज्ञान परिपह सहन करणे म्हणजे त्यास अज्ञान परिषह जय म्हणावे.
म २२) अदर्शन - संयमप्रधान दुष्कर तप करूनही मला अजूनपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून संयम, तप दीक्षा सगळे व्यर्थ आहे. अशा प्रकारचे चिंतन करून मनात अश्रद्धा उत्पन्न करू नये. उलट आपल्या सम्यग्दर्शनाला दृढ कारावे. हे अदर्शन परिषह जय आहे.
र अशाप्रकारे बावीस परिषह शांततापूर्वक सहन करण्याने संवर होतो. कोणत्याही प्रकारची वेदना उत्पन्न झाली तर आत्मस्वरूपाचे चिंतन करावे. व्याकुळ न होता सर्व परिषह सहजतेने सहन करणे यास परिषह जय म्हणतात.३०५
पाच चारित्र्य
संवराच्या सत्तावन्न भेदांमध्ये परिषहचे वर्णन केल्यानंतर चारित्र्याचे वर्णन येते. चारित्र्याचे पाच प्रकार आहेत.
१) सामायिक २) छेदोपस्थापना ३) परिहार विशुद्धी ४) सूक्ष्म संपराय ५) यथाख्यात३०६
१) सामायिक चारित्र्य - सर्व सावद्य योगांचा अभेद रूप सर्वकालिक अथवा निश्चित वेळेपर्यंत त्याग करणे सामायिक आहे.
२) छेदोपस्थापना - प्रमादामुळे स्वीकारलेल्या निरवध क्रियेत अर्थात दीक्षा घेतल्यानंतर कोणताही दोष लागला तर त्याचा सम्यक प्रतिकार करावा. दंडरूपात अगोदर पालन केलेल्या दीक्षेचा छेद करणे, रद्द करणे आणि मग पुन्हा महाव्रत अंगिकार करणे यास छेदोपस्थापना चारित्र्य म्हणतात.
___३) परिहारविशुद्धि - ज्यात प्राणिवधाचा पूर्ण परिहार व त्याचबरोबर विशेष प्रकारची विशुद्धी असणे यास परिहारविशुद्धी चारित्र्य म्हणतात. विशेष प्रकारच्या तपाने विशुद्धी होणे या चारित्र्याचे वैशिष्ट्य आहे. या चारित्र्याचे दुसरे वैशिष्टय हे की ३० वर्षाच्या