________________
सुद्धा सिंहाप्रमाणे निर्भय रहावे.
१०) निषधा - श्मशान, शून्यस्थानी, गिरिगुंफा अशा जागी ध्यान आदी करताना ज्या आसनात बसलेले असाल त्यावेळी कोणतेही उपसर्ग आले तर त्या आसनात स्थिर
रहावे.
(४५०)
११) शय्या शास्त्रानुसार एका कुशीवर, ओबडधोबड भूमीवर झोपावे लागले तरी विचलित होऊ नये. ते कष्टपण शांतीने सहन करावे.
अत्यंत कठोर शब्द ऐकून ही शांत राहणे, क्रोध करू नये
१२) आक्रोश हा आक्रोश परिसह जय आहे.
१३) बध - पूर्वीचे शत्रुत्व, द्वेषभावामुळे कोणी तिरस्कृत केले, बांधून टाकले, अथवा शस्त्राने मारले तरी वैरभाव न ठेवता उलट क्षमाअमृताने मारणाऱ्याच्या प्रति मैत्रीभाव ठेवणे बध परिसह जय आहे.
१४) याचना आगम विधीप्रमाणे भिक्षा घेणारे साधू अती क्षीण झाले इतकेच नव्हे तर प्राण जाण्याची वेळ आली तरी कधीही दीनतेने अविधीने आहार इ.ची याचना न करणे.
१५) अलाभ अनेक घराघरांत जाऊन भिक्षा मिळाली नाही तर मनात किंचितही क्लेश होऊ न देणे अलाभ विजय आहे.
-
१६) रोग परिषह - हे शरीर व्याधींचे घर आहे. समजा शरीरात कोणत्याही रोगाने प्रवेश केलाच तर यास पूर्वजन्मीच्या पापाचे फळ आहे असे समजून त्या परिस्थितीला शांतपणे भोगून घेणे हाच उऋण होण्याचा मार्ग आहे. अशाप्रकारे विचार करून मनस्वास्थ्य टिकवून ठेवणे अवघड कार्य आहे म्हणूनच याला रोग परिसह जय म्हटले आहे.
१७) तृण स्पर्श घास (तृण) काष्ट व बारीक दगड यांचा अवरोध आला दुःख न मानता निश्चल राहणे तृणस्पर्श परिषह जय आहे.
तरी
१८) मल शरीर मलीन झाले तरी त्याची घृणा न करणे, परंतु कर्ममत दूर कसे होतील याचेच चिंतन करणे प्रयत्न करणे म्हणजे मल परिषद् जय होय.
१९) सत्कार पुरस्कार - मान-अपमान यात समचित्तवृत्ती ठेवणे सत्कार पुरस्काराची आकांक्षाच ठेवायची नाही. फक्त श्रेय मार्गाचा विचार करावा, यास सत्कार पुरस्कार परिषह जय म्हटले आहे.