________________
ARHARERA
वयाचे. ज्याने तीन वर्षापासून नऊ वर्षापर्यंत तीर्थकरांच्या चरणांची सेवा केली असेल प्रत्याख्यान नावाच्या पूर्वाचे पारंगत, अप्रमादी, उत्कृष्ट निर्जराशाली साधुला परिहारविशुद्धी चारित्र्य असते.
४) सूक्ष्मसम्पराय चारित्र्य - सूक्ष्म स्थूल प्राण्यांच्या वधापासून पूर्णपणे निवृत्त आहे. अप्रमत्त आहे. अत्यंत निर्बाध उत्साहशील, अखण्डित चारित्र, सम्यग्दर्शन आणि सम्यग्ज्ञान रूपी भयंकर गतिमान हवेच्या प्रवाहात प्रशस्त अध्यवसाय रूपी अग्नीज्वालामुळे कर्मरूपी ईधनाला जाळून टाकले आहे. ध्यानाच्या विशेष क्रियेने कषायाचे विषांकुर नष्ट केले आहे. सूक्ष्म मोहनीय कर्माच्या बीजत्वपण ज्यांनी नाश केला आहे, त्या परम सूक्ष्म लोभ कषायवाले साधूंचे सूक्ष्मसंपराय चारित्र असते.
५) यथाख्यात चारित्र - जो मोहाच्या संपूर्ण उपशम किंवा क्षय झाल्यानंतर प्रकट होतो. त्यास यथाख्यात म्हणतात कारण की, जसा परिपूर्ण शुद्ध आत्मस्वरूप आहे. तसाच यात आख्यात प्राप्त होतो. किंवा भ. अरिहंतांनी शास्त्रात जसे सांगितले आहे तशा चारित्र्याला यथाख्यात म्हणतात. यामुळे सर्व कर्मांचा क्षय होतो.
हे चारित्र्य पूर्वानवाचा निरोध करतात म्हणून परम संवर रूप आहे. ३०७
मूलाचारात आचार्य वट्टकेर यांचे ही हेच मत आहे. की, ज्या कारणांमुळे आनवद्वाराने कर्म येतात त्याचा निरोध करणे म्हणजे संवर होतो. इंद्रिय, कषाय इ. दोष तप, ज्ञान, विनय यांच्याद्वारे निगृहित होतात ज्याप्रमाणे बेफाम झालेले घोडे लगामाने ताब्यात ठेवले जातात.३०८
इंद्रियांचा तप केल्याने निग्रह होतो. कषाय, ज्ञान भावनाने वश केले जातात आणि विनय क्रियाद्वारे द्वेष नष्ट होऊन जातो. मन बचन काया द्वारा इंद्रियांना वश करून समितीच्या पालनात अप्रमादी झाले तर साधूंचे आस्रवद्वार बंद होतात व नवीन कर्म रज येत नाहीत, आनव होत नाही.
मूलाचारात दर्शन विरतिनिग्रह, निरोधाने मिथ्यात्व अविरती, कषाय आणि योगाच्या साह्याने कर्माचे येणे थांबते असे सांगून आनव व संवर दोन्हींचा एकाच पद्यात समावेश केला आहे.३०९
संवराचे फळ निर्वाण आहे म्हणून यात आचार्यांनी प्रेरणा दिली आहे की नेहमी उद्यमशील विशुद्ध आत्म्याने या संवर भावनेची भावना करावी.३१०