________________
SSIKARSERICORNERasaili
आत्मप्रदेशात कर्माचे आगमन होते. त्यात प्रथम क्रमांक आहे मिथ्यात्वाचा.२५६
मिथ्यात्वाचे स्थान प्रमुख आहे. जिथे मिथ्यात्व असेल तिथे अविरती इत्यादी पढील चार कारण असणारच. परंतु अविरती, प्रमाद बगैरे पुढील आसवात मागचे आनव असूही शकतात किंवा नसूही शकतात. पण पुढील अवश्य असतातच. अन्य ग्रंथकारांनी मिथ्यात्वाचे पाच भेद फक्त घेतले आहेत. पं. रत्नचन्द्रजी महाराजांनी आगम अनुसार पंचवीस भेद घेतले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.
१) अभिग्रहिक मिथ्यात्व - खोट्या पक्षाला समजून किंवा न समजून हट्टाने धारण करणे, कुदेव, कुगुरू आणि कुधर्मा प्रती कदाग्रह ठेवणे, आणि म्हणायचे की हे तर आम्ही कधीच सोडणार नाही आमचा हा पिढीजात धर्म आहे. असा हठाग्रह करणे म्हणजे अभिग्रहिक मिथ्यात्व होय.
PRERNA
२) अनभिग्रह मिथ्यात्व - गुण-अवगुण जाणल्याशिवाय असत्याला सत्य समान मानणे, सत्य काय असत्य काय याचा निर्णय करायचा नाही. असे हे अनभिग्रह मिथ्यात्व होय.
३) अभिनिवेशिक मिथ्यात्व - स्वतःची गोष्ट सत्य सिद्ध करण्यासाठी सूत्राचे अर्थ उलटसुलट लावून कुयुक्तिचा उपयोग करणे.
४) संशयिक मिथ्यात्व - जिन वचनात शंका झाली तर शंकानिरसन करण्यात कमीपणा वाटणे. आपली इज्जत जाईल या भीतीने संशय तसाच मनात ठेवणे. त्याचे समाधान मिळविण्याचा प्रयत्न न करणे हे संशयिक मिथ्यात्व होय. अशा संशयात राहिल्याने मानव सम्यक्त्वापासून विमुख होतो.
५) अनाभोग मिथ्यात्व - एकान्त जड आणि मूढ अवस्था. नशेमध्ये बेभान झालेल्या माणसासारखी अवस्था, कुठलाही सारासार विचार नाही जीवाजीव, पुण्य-पाप याचे कोणतेही ज्ञान नाही.
६) लौकिक मिथ्यात्व - लौकिक पर्व, लौकिक तीर्थ, लौकिक देवी-देवता यात विश्वास ठेवणे.
७) लोकोत्तर मिथ्यात्व - लोकोत्तर 'मोक्ष मार्गाचे दाता' देव, गुरू धर्म यांचे नवस बोलणे, भौतिक सुखाच्या लालसेने तप जप इत्यादी करणे.
८) कुप्रावचन मिथ्यात्व - पाखंडी शास्त्रांना मानणे.