________________
९) जिनमार्गाहून न्यून सांगणे मिथ्यात्व - बीतराग भगवतांनी जो मार्ग दाखवला त्याला न्यून (तुच्छ) मानणे.
१०) जिनमार्गापेक्षा अधिक सांगणे (प्ररुपणा करणे) मिथ्यात्व - अर्थात जिनेश्वर भगवनांनी जितके व जसे सांगितले आहे ह्यात अधिक मनाचे जोड़न सांगणे म्हणजे मिथ्यात्व.
११) जिनमार्गाच्या विपरीत प्ररूपणा केली तर मिथ्यात्व. १२) धर्माला अधर्म मानले तर मिथ्यात्व. १३) अधर्माला धर्म मानणे मिथ्यात्व. १४) जीवाला अजीव मानणे मिथ्यात्व. १५) अजीवाला जीव मानले तर मिथ्यात्व. १६) जिनमार्गाशिवाय अन्य मार्ग स्वीकारणे मिथ्यात्व. १७) अन्यमार्गाला जिनमार्ग मानणे मिथ्यात्व. १८) साधूला कुसाधू मानणे - मिथ्यात्व. १९) कुसाधूला साधू मानणे - मिथ्यात्व. २०) मुक्तजीवांना अमुक्त मानणे - मिथ्यात्व. २१) अमुक्तजीवांना मुक्त मानणे - मिथ्यात्व. २२) अविनय मिथ्यात्व - विनय करण्यास योग्य असलेल्यांचा विनय न करणे.
२३) अक्रिया मिथ्यात्व - करण्यायोग्य क्रिया न करणे आणि न करण्यायोग्य क्रिया करणे. दुष्ट क्रिया करणे.
२४) अज्ञान मिथ्यात्व - ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्नच करायचा नाही. अज्ञानातच सुख मानायचे.
२५) अशातना मिथ्यात्व - गुरू इत्यादींचा अपमान (आशातना) करणे. आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास मिथ्यात्व सर्वाधिक निम्नस्तराची दशा आहे. कारण की मिथ्यात्व अवस्थेत जीवाला स्वस्वरूपाचे ज्ञानच नसते. अविरती अव्रत
अव्रत आनवाचा दुसरा भेद आहे. ज्याप्रमाणे आजोबा, पणजोबांनी कमवलेली
sh
Samabe