________________
(४२८)
समुद्रपालमुनी संसार अवस्थेत असताना राजमहलाच्या झरोख्यातून नगरचर्या पहात होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एका चोराला बेड्याने बांधून नेत आहे. हे दृश्य पाहुन ते विचार कररू लागले - अरे ! ह्याला कोण पकडून नेत आहे का ? नाही ! त्याचे स्वतःचे केलेले अशुभ कर्म उदयात आले आहे त्याचे हे फळ आहे.
"अहो असुभाण कम्माणं निज्जाणं पावगं इमं ।।"
अरे ! जीवा, तू सुद्धा असे कर्म करशील तर तुझीपण हीच अवस्था होईल. संसारात भ्रमण करून दुःखी व्हावे लागेल. अशाप्रकारे कर्मानवाचे चिंतन करता-करता समुद्रपालांना जातिस्मरण ज्ञान प्राप्त झाले. मग संसाराच्या सुखांना तिलांजली देऊन समदपालमनी झाले. आस्रवाचा निरोध करून संबराचे स्वामी बनले.२५४
___ अशाप्रकारे आस्रवमार्गाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून, त्याच्या मूळरूपाला समजून घेरून, चिंतन मनन करून आग्नव भावनाने अंत:करण भावित करून आनव भावापासून
दूर राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आस्रव निरोधरूप संवरभावनेचे आचरण केले पाहिजे.
आग्नव चतुर्गतीमध्ये भरकटायला लावतो. मोहाच्या निद्रेतून जागृत झाल्याशिवाय, कर्मानवाला अडविल्याविना आत्मशांती प्राप्त होऊ शकणार नाही. आत्मशांती प्राप्त करण्यासाठी मोहाचे बंधन तोडावे लागतील आणि आनवद्वार अवरुद्ध करावे लागतील. छाश आरनव भावना असे मुख्य व मूळ द्वार आहे की त्या चिंतनाने आत्मा परमोच्च स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. ह्याचे चिंतन केल्याने आत्मा मलिन न होता परम शुद्ध सिद्ध रस्थान प्राप्त कररू शकतो. संपूर्ण आस्रवांचा निरोध संवर होऊन जातो. आणि तोच परिनिर्वाण किंवा मोक्षाचे कारण बनतो. म्हणूनच आस्रव भावनेचे चिंतन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आस्रवभावनेचे वर्णन करताना भावना शतकमध्ये मिथ्यात्व, अव्रत, प्रमाद, कषाय, आणि योग या पाच आसवांचे ८२ भेद आहेत. याचा उल्लेख केलेला आहे.२५५ याचा पूर्वी उल्लेख झाला आहे. मिथ्यात्वाचे विवेचन करताना पूज्य रत्नचन्द्रजी महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे पट-वस निर्मितीमध्ये तंतूंचे समूह असणे मुख्य कारण आहे, घट बनविण्यासाठी माती मुख्य कारण आहे. जमिनीत असंख्य तृण उगवतात त्याचे मूळ कारण बी आहे, त्याचप्रमाणे ज्ञानावरणीय इत्यादी आठ कर्माची उत्पत्ती आणि त्याचा विस्तार
। मुख्य कारण 'मिथ्यात्व' म्हटले आहे. ते आग्नव पाच आहेत. त्याद्वारे