________________
(४२७)
फळ भोगावे लागतो ज्याच्याने अशी भयंकर वेदना जीवाला भोगावी लागते की त्याचे वर्णन करताना हृदय कंपित होते.
नंतर एक एक इंद्रिय विषयाच्या आसव विपाकाचे वर्णन आहे ज्याचे वर्णन पूर्वी झाले आहे.
हास्य, मश्करी, निंदा, दुसऱ्याचा वाईटपणा, विकथा इत्यादी मोठे दुःखरूप आहे. ह्याच्या वश झालेले जीव नरक आणि निगोदपर्यंत जातात, ह्या आसवाच्या पंचात फसून पूर्ववर सारखे महाविद्वान मुनीदेखील आपले शिकलेले आगम ज्ञान विसरले तर दुसऱ्यांची
काय कथा ?
अल्पज्ञ जीव हास्य इत्यादीच्या वश होऊन धर्म विसरले तर त्यात काय मोठी गोष्ट ? परिणाम स्वरूपी नरक निगोद सारख्या एकदम अधम दुर्गतीच्या कैदेमध्ये दीर्घकाळापर्यंत राहावे लागते. आसवाच्या अशा भयानक स्थितीला समजून आनवसेवन कसे केले जाऊ शकेल. २५२
-
कविवर बुधजनजी लिहितात कुणी चांगले अथवा वाईट नाही. वस्तूचा वेगवेगळा स्वभाव आहे. मनुष्य व्यर्थ आपल्या मनात संकल्प-विकल्प करून राग द्वेषाने भावास्रव आणि द्रव्यानवाचा बंध करतो ज्याच्याने कर्मामुळे जीव व्यथित होतो. दुसरे कुणी कुणाला व्यथित अथवा दु:खी करत नाही. २५३
ह्याच्यात कवी बुधजनजी यांनी फारच महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की मनुप्य आपल्या संकल्प-विकल्पाने अनर्थच्या पाप आम्रवाचे सेवन करत जातो आणि कर्म बांधत जातो, जितके कर्म अनर्थच्या कामाने बांधले जातात तितके एखाद्या अर्थपूर्ण कार्यानेपण बांधले जात नाही. मनात दुसऱ्यांच्या प्रती जो अनुमान लावला जातो, ती व्यक्ती अथवा वस्तू काही चांगली वाईट नसते जी वस्तू अथवा व्यक्ती एकाला चांगली वाटते तीच दुसऱ्याला चांगली वाटत नाही. हा दृष्टीचा दोष आहे. ज्याच्याने राग-द्वेष वाढत जातात आणि मनुष्य कर्माने भारी होत जातो. ज्याची काहीच आवश्यकता नाही. अशा कार्यान जीव अज्ञानामुळे फसत जातो त्याला समजून त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे काम करणे अनिवार्य आहे त्याच्याने सुटण्यात त्रास होतो पण अनावश्यक पापाने सुटणे कठीण नाही. फक्त त्या दिशेने ध्यान ठेवणे आवश्यक आहे. शरीरात वाढणारी नखे आणि केसांना कापून टाकले जाते. तसेच ह्या अनर्थच्या आग्रवाला सोडण्याचा सतत पुरुषार्थ केला पाहिजे आणि अनर्थच्या पापस्रवाचा संबंध तोडून टाकला पाहिजे.