________________
BioleriKMAMdianRDAasad
आचार्य शुभचन्द्रांनी शुभ आस्रव आणि अशुभ आग्नवाचे विवेचन करताना लिहिले आहे. यम अर्थात अणुव्रत, महाव्रत इत्यादी, प्रशम-कषायाची मंदता, निर्वेदसंसाराने वैराग्य आणि तत्त्वाचे चिंतन इत्यादीचे आलंबन असले पाहिजे आणि मैत्री, प्रमोद, कारुण्य आणि माध्यस्थ ह्या चार भावनांची ज्याच्या मनात भावना असते तोच शुभानवाला उत्पन्न करतो आणि कषायरूपी अग्नीने प्रज्वलित व इंद्रियांच्या विषयाने व्याकुळ मन संसारबंधनाचे सूचक अशुभ कर्माचा संचय करतो.२५१
श्री जयसोमुनींनी आगमाच्या आधारावर आस्रव भावनेचे वर्णन केले आहे. त्यात लिहिले आहे की आचारांग सूत्राच्या दुसऱ्या अध्ययनामधे संसाराचे मूळ कपाय आहे, असा उल्लेख केला आहे आणि जीवाला संबोधन करून म्हटले आहे की हे जीव संसार महावृक्षाचे सर्जन करणाऱ्या कषायाचे सेवन का करतो ? जिनेश्वर भगवान आपल्याला ज्ञानरूपी दिव्याने कषायाच्या भयंकर नरक इत्यादीचे दुःख समजावून सांगतात. म्हणून हे प्राणी ! आग्नवाचा त्याग कर. ह्या आग्नवाच्या दुष्ट विपाकाचे विस्तृत वर्णन प्रश्नव्याकरण सूत्रात आहे ज्याचा पूर्वी उल्लेख केला गेला आहे.
कषाय हिंसा इत्यादी पाप आस्रव आहे, हिंसा अत्यंत कटुकर्मफळ देणारी आहे असे विपाक सूत्रात वर्णन आहे. हिंसेप्रमाणे असत्य, चोरी इत्यादी आसवांचेपण भयंकर परिणाम भोगावे लागतात, त्याचे उदाहरण देऊन त्यांनी लिहिले आहे की वसुराजा सत्याला चांगल्याप्रकारे जाणत होते. गरूनी "अजचा होम करावा" असे सांगितले. वास्तविक अजचा अर्थ जुने जव असा आहे हे जाणत असताना पण अज म्हणजे बकरा असे खोटे अर्थ त्यांनी सांगितले. ते असत्य वचन त्यांना असे दुःखरूप निवडले की त्याच भवात देवांच्या लाथांनी तो खाली आपटला गेला आणि मरून नरकात गेला. तसेच मंडीक चोर परक्याचे धन चोरत होता आणि एकदा राजाच्या जाळ्यात तो पकडला गेला आणि अत्यंत दुःखी झाला. अब्रह्मच्या सेवनाने तर कित्येक मनुष्य आणि देवांची हालत बिघडली. महाआरंभ महापरिग्रहाने ब्रह्मदत्त चक्रवर्ती सातव्या नरकात गेले. म्हणून ज्ञानी म्हणतात की जो आसवाचा सेवन करतो तो शत्रूचे काम करतो. अशा प्रकारे जीवाला दुर्गतीमध्ये घेऊन जाणारे आग्नव दुर्गतीचे दूत आहे. एकेन्द्रिय जीव जे प्रत्यक्षरूपात एका पण पापरथानाचे आचरण करत नाही तरी व्रत न घेतल्यामुळे अठरा पापस्थानांच्या अविरतीचे पाप आणि कायिकी इत्यादी पाच क्रियेचे पाप तर लागतातच. असे भगवती सूत्रामध्ये लिहिले आहे.
सुयगडांग सूत्रात वर्णन आहे की पंचवीस क्रियास्थानांच्या सेवनाने जीवाला कटू