________________
(८७)
करतो तो वैराग्यभावनेत रममाण होतो. आणि जो काया, वाचा, मनाद्वारे वैराग्य भावनेत तीन होतो तो वीतरागी बनतो. त्याच्यासाठी मोक्ष दूर नाही. भावनेचा, मोक्षमार्गाचा
शि असल्याने अनेक आचार्यांनी याच्या अनेक परिभाषा केल्या आहेत अगदी जवळचा संबंध असल्याने अनेक आचार्यांनी याच्या परिभाषा सतत अभ्यास, चिंतन, अनुभावनेच्या दिशेने संकेत करतात.
अनप्रेक्षा - भावनेसाठी 'अनुप्रेक्षा' शब्दाचा प्रयोग सुद्धा ह्याच अर्थाने होतो. आगमग्रंथात आगमाच्या टीकाग्रंथात आणि अन्य ग्रंथामध्ये 'अनुप्रेक्षा' शब्दाच्याही समानरूप परिभाषा केल्या आहेत. त्याच्या अभिप्रायावर प्रकाश टाकला आहे. त्यातल्या काही परिभाषांचा येथे उल्लेख केला जाईल..
'अनुप्रेक्षा' शब्द 'अनु + प्र + ईक्ष्' याच्या योगाने बनला आहे. 'अनु' आणि 'प्र' हे उपसर्ग आहेत. 'ईक्षा' शब्द 'ईक्ष्' धातूपासून बनला आहे. 'ईक्ष्' याचा अर्थ पाहणे, आलोचना करणे, अवलोकन करणे असा आहे.३३ 'प्र+ईक्ष' याच्यापासून प्रेक्ष' बनतो ज्याचा अर्थ पाहणे, दृष्टी टाकणे असा होतो.३४ 'अनु' चा अर्थ पुन्हा, पुन्हा, मागे, मागे पाहणे असा होतो.३५ अशाप्रकारे अनुप्रेक्षा शब्दाचा अर्थ वारंवार पाहणे, चिंतन करणे, त्यात तन्मय होते असा होतो.
अनुप्रेक्षा शब्दाचा अर्थ चिंतन, ग्रंथचिंतन आणि सूत्राच्या अनुचिंतनाच्या अर्थाने घेतलेला आहे.३६
धर्मरत्न प्रकरणामध्ये सांगितले आहे की जिनेश्वराच्या प्रवचनाने गुरुजनांच्या वाणीने जे पूर्वी ऐकले आहे त्याला अत्यंत एकाग्रचित्ताने श्रुतविचाराचे चिंतन करणे म्हणजे अनुप्रेक्षा आहे.३७
ए. एन. उपाध्ये यांनी सांगितले आहे की ज्या ज्या विषयाचे चिंतन केले जाते त्याच्या अनुसार अनुप्रेक्षेचे सुद्धा तेच नाव होते. म्हणजे शरीर, पदार्थ इत्यादीच्या
आनत्यतेचे चिंतन अनित्यानुप्रेक्षा नावाने अभिहित केले जाते. त्याच्या अशुचितेचे चिंतन 'अशुची अनुप्रेक्षा' या नावाने अभिहित केले जाते. अनु म्हणजे सूक्ष्मतेने पुन्हा पुन्हा पाहणे, चिंतन करणे, स्मरण करणे, अनुप्रेक्षा आहे.३८
आचार्य जिनदास गणि महत्तर यांनी सांगितले आहे की, "वाचलेल्या श्रुतज्ञानाचे
मानचितन करणे, वाणीने नाही. अनप्रेक्षेमध्ये मानसिक चिंतनाची विशेषता आहे. शब्दांचे वाणीद्वारे उच्चारण झाल्यावर ती परावर्तना होईल.३९
पाणापक्षा मनाची शक्ती अधिक आहे मानसिक शक्तीने तर कल्पनिवासी दवाच
व अर्थाचे मनाने चिंतन करणे, वाणीने नाही, अनुप्रक्ष