________________
(८६)
नभ भावांना शुद्ध करणे तेथे शुभ आणि शुद्ध भावाची प्रतिस्थापना करणे ही भावनेची विशेष उपयोगिता आहे.
उदास्थ साधकाचे ध्यान अंतर्मुहूर्त काळापर्यंत अवस्थित राहते. त्यानंतर ध्यानांतर होते तेव्हा चंचल चित्ताला स्थिर करून ध्यान साधनेमध्ये प्रवेश करण्यासाठी 'भावना'
बनविते. भावना ही भ्रष्ट झालेल्या ध्यानाला पुन्हा जोडण्यासाठी माध्यम बनते. एक प्रकारे भावना चित्ताला समतोल बनविते, ज्याच्यावर ध्यानरूपीभवन निर्माण होते.२७
आचार्य कुंदकुदांनी 'बारस अणुवेक्खा' याचा उपसंहार करताना अत्यंत मार्मिक गोष्ट सांगितली आहे की, "अनादि काळापासून आजपर्यंत जे पुरुष मोक्षाप्रत पोहचले आहेत ते बारा भावनांच्या चिंतनानेच निर्वाण-मोक्षाला पोहचले.२८
आचार्य हेमन्द्रांनी आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितले आहे की, समभावाच्या प्राप्तीसाठी निर्ममत्वाची भावना आणि निर्ममत्वाची भावना जागृत करण्यासाठी द्वादश भावनेचा आश्रय घेतला पाहिजे.२९
Headline
आत्मस्वरूपाची भावना नसेल तर कोट्यावधी जन्म घेऊन, बाहू उंचावून आणि यखाचा त्याग करून जीवाने जरी तपाचरण केले तरी त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही इतके भावनेचे महत्त्व आहे.३०
वैराग्यवर्धक भावना मुक्तीपथाचा आधार आहे. लौकिक जीवनामध्येही भावना अत्यंत उपयुक्त आहे. इष्ट वियोग आणि अनिष्ट संयोगाने उत्पन्न होणाऱ्या उद्वेगाला ह्या भावना शांत करतात. भावना व्यक्तीला विपत्तीत धैर्य आणि समृद्धीत विनम्रता शिकवते विषयांपासून विरक्त करते आणि धर्मामध्ये अनुरवत करते. मृत्यू आणि मोहाच्या भयाला कमी करते. जीवनाचा क्षण आणि क्षण आत्महितामध्ये लावून जीवन सार्थक करण्याची प्रेरणा देते. जीवन निर्माण करण्यामध्ये भावनेची उपयोगिता असंदिग्ध आहे.
भावना' हे नाव आत्म्याच्या गुणविशेषाचे आहे, ज्या ज्ञानाद्वारे आत्मपर बोध उत्पन्न होतो. भावना उत्तम ज्ञानाचा हेतू आहे. अर्थात ज्यांना बघितले आहे, ज्यांचा अनुभव घेतला आहे, 'श्रुत' ज्यांनी ऐकले आहे अशा स्मृती प्रत्यभिज्ञानात प्रज्ञा जोडल्याने त्यात चिंतनोन्मुख झाल्याने ज्यांचा प्रादुर्भाव होतो त्यांना भावना म्हणतात.३१
पुन्हा पुन्हा अनित्यता इत्यादींचे ज्ञान झाल्याने सांसारीक पदार्थांमध्ये निर्गुणतेची, असारतेची परिभावना होते.३२
ससाराची अनित्यता, अशरणता इत्यादींचे ज्याला ज्ञान होते, त्याचे जो निरंतर