________________
(८५)
वारीराला अलंकृत केले जाते, अंगराग, तेल, अत्तर इत्यादींनी सुगंधित केले जाते त्याचप्रमाणे मनाच्या विचारधारेला अथवा चिंतनधारेला भावनेने शुद्ध करणे, पवित्र करणे, सजविणे म्हणजे परिकर्म होय. शारीरिक परिकर्माचा विषय बाह्य सौंदर्य आहे, तेव्हा आंतरीक परिकर्माचे लक्ष्य आंतरीक सौंदर्य आहे जे जीवनाच्या पवित्रतेसाठी आहे.
चित्तामध्ये पुन्हा पुन्हा भावांचा उद्भव होणे, येणे, स्थिर होणे म्हणजे भावना आहे. २३ जसे लोक एखाद्या ठिकाणी जाऊन पडाव टाकतात आणि तिथेच टिकून राहतात, धर्मशाळेतल्या लोकांप्रमाणे एक दिवस राहून निघून जात नाहीत. त्याचप्रमाणे मनात भावनेचा असा प्रवेश अवथा उद्भव होतो की ज्या सातत्याने टिकून राहतात आणि संस्काराचे रूप धारण करतात त्यांना भावना म्हणतात.
ज्यांच्यामध्ये पूर्वीचे संस्कार अखंड आहेत तरीही त्याच्या पुन्हा पुन्हा अनुष्ठानाला सुद्धा 'भावना' म्हणतात.२३ ह्यात पूर्व संस्कार आणि पुन्हा पुन्हा चिंतनधारांना भावना रूप दिले आहे. वास्तविक ज्या विचाराच्या सतत चिंतनाने, संघर्षाने मन त्या अनुरूप भावित होत जाते त्या विचारांना 'भावना' म्हणतात.
अध्यात्म अनुर्वतनामध्ये स्थित होणे म्हणजे भावना आहे. २४ याचा अर्थ असा की मनुष्य आत्मभावामध्ये निमग्न राहतो. आणि जो आत्मभावामध्ये लीन राहतो त्याचा बहिरात्मभाव आपोआप सुटतो. आचार्य सिद्धसेन दिवाकरांनी 'द्वात्रिशिका' यामध्ये अत्यंत सुंदर विचार मांडले आहेत “अभ्यासाने भावनेची वृद्धी होते. कारण भावना बुद्धीसंगत आहे असे केल्याने अशुभभावनेपासून मन निवृत्त होते. त्याच्या फलस्वरूपी प्रशस्त भावाची उत्तरोत्तर वृद्धी होते.२५
-
मुमुक्षुद्वारे अनित्यादी चिंतनांचा अभ्यास केला जातो, पुन्हा पुन्हा ज्याचे अनुभावन केले जाते त्याला भावना म्हणतात. २६
ज्यांच्या जीवनाचे लक्ष्य मोक्षप्राप्ती आहे, त्यांच्या मनामध्ये ज्या विचारधारा चालू असतात त्या आत्मोन्मुख असतात अशा चिंतनाने भावित होत राहणे त्या दृष्टीने अभ्यास करत राहणे भावना आहे.
भावनेचा आशय आत्म्याला प्रशस्त भावाने भावित करणे आहे. ज्याप्रमाणे शिलाजिताला लोहाची भावना देऊन त्याला शुद्ध आणि शरीर हितकारी रसायनांच्या रूपात उपयुक्त केले जाते त्याचप्रमाणे भावनेद्वारा व्रत आणि विचारांना शुद्ध, विशुद्ध आणि आत्महितकारी रसायनरूप बनवले जाते. अनादिकालापासून आत्म्याबरोबर संयुक्त झालेल्या