________________
(८४)
'आवश्यक' सूत्राचे प्रसिद्ध टीकाकार आचार्य हरीभद्र यांनी भावनेची परिभाषा करताना लिहिले आहे की, ‘भाव्यतेऽनयेति भावना' १५ ही भावनेची शाब्दिक व्युत्पत्ती आहे. ह्याचा आशय हा आहे की, ज्याच्याद्वारे मनाला भावान्वीत केले जाते ती भाव आहे. अथवा ज्याच्याद्वारा मनाला भावित केले जाते त्याला 'भावना' म्हणतात. भावान्वित होणे म्हणजे भावनेने भरून जाणे, ओतप्रोत परिपूर्ण होणे. जेव्हा मनामध्ये उत्तरोत्तर भाखता वाढत जाते तेव्हा मन तितकेच भावनेने द्रवित होत जाते.
‘विशुद्धभाव म्हणजे पवित्र विचार ही जीवनाची सुगंध आहे. '१६ 'भावना' शब्द अभ्यास आणि क्रियेचाही सूचक आहे. १७ अभ्यास शब्दाचा मतितार्थ 'कोणत्याही कार्याला करणे.' असे केल्याने कार्यामध्ये परिपक्वता आणि दृढता येते. अभ्यासाशिवाय पुन्हा पुन्हा कोणतीही गोष्ट जास्त काळापर्यंत टिकत नाही. मनुष्य विसरून जातो म्हणून विद्या, साधना, क्रिया सगळ्यांच्या विकासासाठी अभ्यास आवश्यक आहे. तो अभ्यास सुद्धा सम्यक् असला पाहिजे.
"क्रियेचा सम्यक् अभ्यास भावना आहे. १८
येथे अभ्यासाबरोबर सम्यक् शब्द जोडलेला आहे. तो अभ्यासाच्या विशेषतेला प्रकट करतो. खऱ्या भाबोद्रेकाने अभ्यास केला जातो तो फारच व्यवस्थित आणि उत्तम होतो. त्या अभ्यासाबरोबर आंतरीक वृत्ती जोडलेली असते.
"अभ्यास आणि भावना एकार्थक आहेत १९ जसे
अभ्यास कोणत्याही कार्याला पुन्हा पुन्हा करण्याच्या अर्थाने आहे. तसाच भावनेचा अर्थ सुद्धा सतत अभ्यास, चिंतन, मनन, अनुप्रेक्षण करण्यात आहे. तो अभ्यासच हळूहळू भावनेच्या रूपात परिणत होतो, "ज्या विशुद्ध प्रयत्नाने जीव भावित होतो, त्याला भावना म्हणतात २० ज्याचे अंतःकरण भावात्मक होते, भावनेने तरल होते. आत्मवृत्ती परिपूर्ण होते, तेव्हा भावनेचा उद्रेक सत्वोन्मुखी होत जातो बहिरात्मभाव सुटत जातो आणि अंतरात्मभाव जागृत होतो. ह्या परिभाषेनुसार भावना असंख्य प्रकारच्या होऊ शकतात. मावनेची विभिन्न रूपे आहेत. प्रत्येक क्रियेबरोबर कोणती ना कोणती तरी भावना असल्याने भावनेचा अनेक दृष्टिकोनातून अनेक अर्थाने प्रयोग केला आहे.
'भावनेचा आशय परिकर्म सुद्धा आहे. २१
'परिकर्म' शब्द 'शारीरिक सजावट या अर्थाने सुद्धा उपयोजितात. ज्याप्रमाणे