________________
(८३)
पक्षाकडे संकेत केला आहे. अभिप्राय वास्तविक चित्ताची आंतरिक वृत्ती आहे, ज्याचे प्रकटीकरण जीवाच्या वचन आणि शरीराच्या संकेताद्वारे होते. कोणत्याही विशेष पदार्थाविषयी अथवा लक्ष्याप्रती जेव्हा मनामध्ये काही विचार उठतात तेव्हा त्यांना अभिप्राय म्हटले जाते. त्याला चित्ताची भावात्मक स्थिती सुद्धा म्हणू शकतो. अभिप्राय जेव्हा प्रबळ बनतो तेव्हा तो संबंधित पदार्थ आणि क्रियेबरोबर इंद्रियांच्या माध्यमाने संयुक्त होतो म्हणजे तो भावमूलक आहे.
कार्याप्रती उत्सुक भावनेला 'अध्यवसाय' सुद्धा म्हणतात. १० जेव्हा मन एखाद्या होते आणि मनामध्ये त्या कार्याविषयी पुन्हा पुन्हा चिंतन चालू राहते, त्या विचार तरंगांना 'अध्यवसाय' म्हणतात. मनातील विचाररूपी तरंगाद्वारे हिंसारूपी पाप नष्ट करून आत्म्याला विशुद्ध करण्याचे कार्य केले जाते. म्हणून भावनेला deep and constant reflection म्हणजे आत्म्यातील विचार तरंगांचे, शुभविचारांचे सूक्ष्मतेने निरीक्षण करणे त्या विचारांना स्थायी रूप देणे. जेव्हा कोणतेही काम करण्याचा उत्साह असतो तेव्हाच अशी स्थिती बनते, उत्साहाने जी कार्ये केली जातात ती सजीव होतात, त्या कार्यांमध्ये ओजस्विता येते. ज्ञानपूर्वक कार्यामध्ये संलग्न आणि समुद्यत राहणे अध्यवसाय आहे.
“भावना शब्द अंतःकरणाची वृत्ती आणि भेदाच्या अर्थात आहे." १२ अंतःकरण म्हणजे इंद्रिये. ही दोन प्रकारची आहेत बाह्य आणि आंतरिक नेत्र, नासिका इत्यादी बाह्य इंद्रिये आहेत. मन हे आंतरेंद्रिय आहे. म्हणूनच मनाला अंतःकरण म्हणतात. बाह्येद्रिये स्थूलरूपात कार्य निष्पन्न करतात. मन हे चिंतन आणि विचाराच्या रूपामध्ये मग्न राहते, हे त्या कार्याचे सूक्ष्मरूप आहे. मन किंवा अंतःकरणाची वृत्ती आणि त्याची वेगवेगळी रूपे भावात्मक असतात. मन हेच भावात्मक कर्माला इंद्रियापर्यंत पाठवते, ज्यांना इंद्रिये स्थूलरूप प्रदान करतात.
“अंतःकरणाची परिणती विशेष म्हणजचे भाव होय. "१३
33
"भावनेचे तात्पर्य आलोचना आहे. "१४
अर्थ 'आ'- समन्तात -
आलोचना हा शब्द ‘आ' उपसर्गपूर्वक 'लोचन' शब्दापासून बनला आहे. त्याचा चारहीबाजूने, पूर्णपणे आणि 'लोचन' म्हणजे 'बघणे' अर्थात 'चारहीबाजूने, पूर्णपणे पाहणे म्हणजे 'आलोचना' होय. येथे बघण्याचा अर्थ 'बाह्य चक्षूने बघणे' असा नाही. परंतु कोणत्याही विषयावर अथवा वस्तुवर समग्ररूपाने चिंतन करणे, मनोभावात त्याच्या स्वरूपाला अंकीत करणे असा अर्थ आहे.