________________
(८२)
'पढमं णाणं तओ दया'६ ही आगमोक्ती ज्ञानाच्या महत्त्वाला प्रकट करते.
"नाणेन विणा न हुंति चरण गुणा"७ ज्ञानाशिवाय चारित्र्यगुणांचा विकास होत नाही. ज्ञान आणि चारित्र्यमय जीवनाला सुदृढ बनविण्यासाठी जैन धर्मात भावाच्या परिष्कारावर, परिमार्जनावर जोर दिला आहे. जर भाव पवित्र आणि निर्मळ असतील तर मनुष्य सद्ज्ञान आणि सत्कर्माच्या दिशेत पुढे जाण्याची प्रेरणा प्राप्त करू शकेल. ज्ञानाराधनेचा मार्ग मानव तेव्हाच स्वीकारतो जेव्हा त्याच्या अंतःकरणात तद्रूप भावनेची सुरसरीता प्रवाहित होऊ लागते म्हणून जैन साधनेमध्ये भावनायोगाचे अत्यंत महत्त्व आहे. भावना योगाबरोबर तेव्हा संयुक्त होते जेव्हा आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याची त्याच्या अंत:करणामध्ये उभारी येते, भावनेमध्ये तो वेग ती तीव्रता येते ज्याच्याद्वारे साधक अंतरात्मभावाने परमात्म भावाच्या दिशेकडे गतिशील होण्याची प्रेरणा प्राप्त करतो. अध्यात्माबरोबर संयुक्त होणे हाच भावनायोग आहे.
भावना आणि अनुप्रेक्षा शब्दाची उत्पत्ती, परिभाषा आणि आशय
होतात. ८
'भावना' शब्द संस्कृतच्या 'भू' धातूपासून बनला आहे. ह्याचे अनेक अर्थ
‘भावयति इति भावना' ह्या व्युत्पत्तीनुसार ज्यात भाव व्यक्त केला जातो त्याला
भावना म्हणतात.
'योग' शब्द संस्कृतमधील 'युज्' धातूपासून बनला आहे. जो जोडतो त्याला 'योग' म्हणतात. भावनेबरोबर जेव्हा योग शब्दाचा संयोग होतो तेव्हा त्याचा 'आत्म्याचे आत्म्याबरोबर मिलन' असा अर्थ होतो. 'भावना' आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे सर्वोत्तम साधन आहे...
भावना अशुद्धीच्या आवरणाने आच्छादिलेल्या आत्म्याला शुद्धत्वाबरोबर जोडते. जैन शास्त्रामध्ये ह्यासंदर्भात म्हटले आहे की मनाला भाव प्रकर्षतापूर्वक शुद्धत्वाबरोबर संयुक्त करणे म्हणजे भावना होय.
आगम ग्रंथाच्या टीकाकारांनी त्याचप्रमाणे अन्य आचार्य आणि विद्वानांनी भावनेचे वेगवेगळे स्वरूप, उपलब्धी आणि परिभाषा इत्यादींवर विस्तृत विचार केला आहे. त्यातल्या अनेक परिभाषांचा उल्लेख येथे केला जाईल.
चित्ताचा अभिप्राय भाव अथवा भावना आहे. ९ ह्यामध्ये भावनेच्या अभिप्राय
129