________________
(८८)
सद्धा डळमळू लागते. जपामध्येही अजपा, जाप (मानसिक जाप) यांचे महत्त्व अधिक आहे. अशाप्रकारे अनुप्रेक्षेमध्ये मानसिक चिंतनाचे महत्त्व आहे. वाचिक शब्द उचारणाचे नाही.
उत्तराध्ययन सूत्रामध्ये स्वाध्यायाच्या अंतर्गत अनुप्रेक्षेला घेतले आहे. 'स्वाध्याय' याचा अर्थ (स्व-आपला, अध्याय - अभ्यास करणे) स्वतःचा अभ्यास करणे की मी कोण आहे ? कोठून आलो आहे ? कोठे जायचे आहे इत्यादींचे सातत्याने चिंतन करणे म्हणजे स्वाध्याय होय. ज्यामध्ये अनुप्रेक्षेचे चौथे स्थान आहे.४१
अनुप्रेक्षेचा संबंध ध्यान आणि स्वाध्याय या दोघांबरोबर आहे. औपपातिक सूत्रामध्ये 'धर्मध्यान' आणि 'शुक्ल ध्यान' यांच्या चार चार अनुप्रेक्षा आत्मोन्मुखता प्राप्त करण्यासाठी आणि विचार उत्कर्षाचा अभ्यास करण्यासाठी निरुपित केल्या आहेत.४२
- अनुप्रेक्षा एक 'स्वाध्याय विशेष' आहे. तो मनाला त्याच्यातच लावल्याने, नियोजित केल्याने होतो.४३
अनित्यादि भावनेच्या चिंतनाने भावित चित्तामध्ये ज्या शांती आणि समधींचे . अवतरण होते ते स्वाध्यायाच्या महत्तेचे प्रतीक आहे. 'स्वाध्याय' बारा प्रकारच्या तपांमधील एक प्रकारचे अभ्यंतर तप आहे, ज्याने कर्म क्षीण होते.
अनुप्रेक्षेने जीव आयुष्यकर्माला सोडून बाकी ज्ञानावरणीय इत्यादि सात कर्मांच्या प्रकृतींचे गाढ बंधन शिथील करतो. दीर्घकालीन स्थितीला अल्पकालीन करतो. त्याच्या तीव्र रसानुभावाला मंदरसानुभावामध्ये परिवर्तित करतो. बहुकर्म प्रदेशाला अल्पकर्म प्रदेशामध्ये बदलतो. आयुष्यकर्माचा बंध क्वचित करतो अथवा करत सुद्धा नाही. कारण आयुष्यकर्माचा बंध जीवनाच्या तिसऱ्या भागात एकदाच होतो. जसे एखाद्याचे आयुष्य नव्वद वर्षांचे आहे, तर साठ वर्षांनंतर तीस वर्षांच्या भागात आयुष्यकर्माचा बंध होतो. अशाप्रकारे तीस वर्षांचा तिसरा भाग अथवा जितके आयुष्य राहिले असेल त्याच्या तिसऱ्या भागात आयुष्य कर्माचा बंध होतो. जर अंतिम काळापर्यंत सुद्धा आयुष्याचा बंध झाला नाही तर आयुष्य समाप्तीच्या अंतर्मुहुर्तापूर्वी (दोन घडी ४८ मिनिटांपूर्वी) तो अवश्य पुढच्या गतीचा बंध करतोच. आयुष्याचा बंध केल्याशिवाय जीवात्मा प्राण सोडत नाही. पस्तु जर जीवाचे त्याच भवामध्ये मोक्षगमन होणार असेल तर तो आयुष्यकर्माचा बंध
नाही अथवा पूर्वी बंध झाला असेल तर पुन्हा आयुष्यकर्माचा बंध करत नाही. परंतु जर आयुष्य कर्माचा बंध अजून झाला नसेल तर अनुप्रेक्षेच्या शुभ अध्यवसायाच्यावेळी