________________
(८९)
जीवात्मा शुभ आयुष्यकर्माचा बंध करतो, अनुप्रेक्षेमध्ये भावधारा इतकी एकाग्र होते की त्यात प्रचंड विद्युतशक्तीसारखी शक्ती निर्माण होते.
उत्तराध्ययन सूत्रामध्ये संसाराची तीन विशेषणे दाखवली आहेत.
१) अणाइयं अर्थात अनादि २) अणवदगं अग्र म्हणजे अंत, ज्याला कधी अंत नाही, असा अनंत, ३) दीहमगं दीर्घ मार्ग असलेला, संसारबनाचा खूप लांब आणि दीर्घ मार्ग ज्याला पार करणे कठीण आहे. परंतु अनुप्रेक्षेद्वारे तो त्याला शीघ्रतेने पार करू शकतो इतकी अनुप्रेक्षेची प्रचंड शक्ती आहे ४३
अनुप्रेक्षेची साधना करणारा साधक पुन्हा पुन्हा असातावेदनीय कर्माचा उपचय करीत नाही. असाता सातोवदनीयाच्या रूपात संक्रमित होते. त्यांचे कर्म लवकर क्षीण होऊन नष्ट होतात. ते कशाप्रकारे कर्म शीघ्रतेने नष्ट करतात हे समजण्यासाठी व्यवहारातील उदाहरणे घेता येतील.
लोखंड कितीही वर्षे पडून राहिले तरी गंजत नाही पण जर त्याला पाणी अथवा मातीचा संपर्क झाला तर ते गंज लागून गंजून जाते, मातीसारखे पसरू लागते.
ज्या काचांना चाकू, सुरी कापू शकत नाही त्या काचा हिरकणीद्वारे लगेचच कापल्या जातात. त्याच्यापेक्षाही अनुप्रेक्षेचा, भावनेचा प्रवाह तीव्रतेने शरीरावर प्रहार करतो. जे कर्म आत्म्याबरोबर हजारो लाखो वर्षापर्यंत चिटकून राहणाऱ्या स्थितीचे असते त्यांची शक्ती कमी होते आणि ते थोड्याच काळात नष्ट होण्याच्या स्थितीपर्यंत पोहचते. अनुप्रेक्षेने कर्माचे स्थिती खंडन स्थिती घात अथवा अपकर्ष होतो.
भावना आणि अनुप्रेक्षा जवळ जवळ समानार्थी शब्द आहेत. ज्याच्यावर चिंतन करायचे असेल त्याला ‘भावना' म्हणतात, म्हणून अनुप्रेक्षेलाही एका अर्थाने भावनेचा समानार्थी शब्द मानला आहे. दोघांच्या परिभाषेमध्ये काही विशेष फरक नाही.
पुराणामध्ये तीन प्रकारच्या भावना मानल्या आहेत १) ब्रह्मभावना २) कर्म भावना आणि ३) उभयात्मक भावना. जसे मनुष्याचे चित्त असेल तशा भावना होतात. ज्यांचे चित्त निर्मळ असते त्याची ब्रह्मभावना असते आणि ज्याचे चित्त विषयवासनेने मलिन असेल त्यांच्या भावना विषयवासनेच्याच असतात.
योगशासानुसार अन्य विषयाला सोडून पुन्हा पुन्हा केवळ ध्येय वस्तूचे ध्यान
करण्याला 'भावना' म्हणतात.
Ang