________________
SHREE
(९०)
अशाप्रकारे भावनेचे महत्त्व सगळ्या धर्मामध्ये आणि देशामध्ये सारखेच आहे. पति जैन दर्शनाचा 'भावना' हा आत्माच आहे. भावनारहित साधना साधकाच्या उन्नति खजी पतनाचाच हेतू आहे. म्हणून प्रत्येक साधनेबरोबर भावनेची प्रधानता अपेक्षित आहे.
दान, शील, तप इत्यादींबरोबर भावना नसली तर सर्व क्रिया निष्फळ आहेत. मंत्र तंत्र, यंत्राच्या जितक्या सिद्धी प्राप्त होतात त्या सर्वांच्या मुळाशी भावना राहते. पाण्याशिवाय जसे रोपटे सुकून जाते तसे भावनेशिवाय सर्व कर्मकांड निष्फळ होते. भाववादी शिवाय धर्मसाधना होऊ शकत नाही.४४ म्हणून जीवनामध्ये भावनेचे अत्यंत महत्त्व आहे. अर्धमागधी जैन आगमामध्ये भावनेचे संकेत अंशिक आणि प्रासंगिक रूपामध्ये दृष्टीगोचर होतात, ज्यांच्यावर पुढे समीक्षात्मक दृष्टीने विचार केला जाईल.
उत्तरवर्ती श्वेतांबर आणि दिगंबर जैन ग्रंथामध्ये ह्याचा उल्लेख आणि विस्तृत विवेचन अनेक ठिकाणी प्राप्त होतो.
तत्त्वार्थसूत्र, प्रशमरतिप्रकरण, कार्तिकेयानुप्रेक्षा, वारसाणुवेक्खा, मूलाचार, ज्ञानार्णव योगशाख, यशस्तिलक, शांतसुधारस, भगवती आराधना इत्यादी अनेक ग्रंथामध्ये भावनेचे अथवा अनुप्रेक्षेचे विस्तृत विवेचन प्राप्त होते.४५
बृहदद्रव्य संग्रहाच्या टीकेमध्ये भावसंवराच्या अंतर्गतसुद्धा भावनेचा उल्लेख झाला आहे.४६
भावना आणि क्रियेचा संबंध घनिष्ठ आहे. कोणता पण व्यक्ती कोणते ही काम करण्यासाठी उद्युत होतो तेव्हा सर्व प्रथम त्याच्या अंत:करणात त्या कार्याचे एक भावात्मक चित्र त्याविषयी भावना उत्पन्न होतात. भावना म्हणजे पुन्हा पुन्हा पाहाणे. भावना परिपक्व होऊन क्रियेच्या रूपात बदलते. परिपक्वतापूर्वक जे कार्य होते ते सुस्थिर होते. त्याचे उत्तम फळ प्राप्त होतात, ते सार्थक होते म्हणून भावनेचे आध्यात्मिक साधनामध्ये अत्यधिक महत्त्व आहे.
जन शासनाचे महान साधक आणि कवी, उपाध्याय विनय विजय यांनी आपल्या शातसुधारस भावना' नावाच्या काव्यामध्ये भावनेचे महत्त्व सांगतांना प्रेरणापूर्ण शब्दात
लिहिले आहे की,
यदि भवभ्रमखेद पराङ्मुखं, यदि य चित्तमनन्त सुखोन्मुखम्। शृणुत तत्सुधियः शुभ भावनामृतरसं मम शान्तसुधारसम् ।।