________________
2
(७५)
त्याचप्रमाणे 'ओघनिर्युक्तीला' आवश्यक निर्युक्तीचा' एक अंश मानला जातो, ज्याची रचना आचार्य भद्रबाहुंनी केली आहे.
ओघनिर्यक्ती हे प्रतिलेखनाद्वार, आलोचनाद्वार आणि विशुद्धीद्वार यामध्ये विभक्त आहे. प्रकरणाच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की साधुजीवन चर्येचा ह्याच्यात समावेश
आहे. १५
पिंडनियुक्ती आणि ओघनिर्युवती ह्या दोन नियुक्तीचा पंचेचाळीस आगमामध्ये समावेश का केला असावा ? असा प्रश्न उपस्थित होतो. आणि दोन्ही वेगवेगळ्या आगम अंशाच्या नियुक्त्या असताना सुद्धा दोन्ही नावे बरोबर का दिली ? हे सुद्धा चिंतनीय आहे. वस्तुतः दोन्ही विषय साधुजीवनाशी संबंधित असल्याने एकत्र दिले असावे असे वाटते.
परंतु निर्युक्त्या अजूनही आहेत. त्यांचा आगमामध्ये समावेश केला जात नाही. ह्या नियुक्ती न मिळविल्यास आगमांची संख्या पंचेचाळीस होणार नाही आणि दोन्ही वेगवेगळ्या मानल्या तर आगमांची संख्या सेहेचाळीस होईल. म्हणून दोन्हींचे विवेचन बरोबर केले असावे असे अनुमान केले जाऊ शकते. हा विषयही विचार करण्यासारखा आहे.
अशाप्रकारे श्वेतांबर स्थानकवासी आणि तेरापंथी परंपरेद्वारा मान्य बत्तीस आगम आणि हे बत्तीस तसेच दुसरे तेरा आगम, जे श्वेतांबर मूर्तीपूजक संप्रदायाला सुद्धा मान्य आहेत, अशा पंचेचाळीस आगमांच्या विषयवस्तूचे थोडक्यात इथे प्रतिपादन केले आहे कारण आगमांच्या आधारावर जैन सिद्धांताची इमारत उभी आहे म्हणून सर्वप्रथम आगमांचे विवेचन केलेले आहे.
उपरोक्त आगम वाङ्गमयाच्या उत्तरवर्ती काळात निरनिराळ्या आचार्य मुनी आणि विद्वानानी जैन सिद्धांताच्या आधारावर प्राकत आणि संस्कृतमध्ये अनेक ग्रंथांची पना कला. ज्यात गद्यात्मक व पद्यात्मक शैलीतच लिहिले गेले. ते प्रबंध काव्य, चरित्र काव्य, सिद्धांत ग्रंथ, कथा इ. रूपात प्राप्त होते. हे सर्व साहित्य भारतीय विद्येची (Indology) अमूल्य निधी आहे.
या आगम वाङ्मयाच्या आधारावरच आजही जैन सिद्धांत जिवंत आहेत. ह्या विशाल वाङ्मयात धर्माचे अनेक विषय प्रतिपादिले आहेत.