________________
RE
(७४)
प्राथायरामा
EMAI
वर्णन केलेले आहे. सहाव्या अध्ययनामध्ये आलोचनाच्या दहा भेदांचे आणि प्रायश्चित्ताच्या चार भेदाचे सुद्धा वर्णन आहे. ह्या सूत्रांची भाषा आणि विषयवस्तू पाहता ह्यांची रचना अर्वाचीन आहे असे वाटते.
जीयकल्प - जीतकल्प सूत्र - ह्याचे रचनाकार सुप्रसिद्ध भाष्यकार निभटगणी क्षमाश्रमण मानले जातात. ह्या सूत्रामध्ये जैन श्रमणांच्या आचारासंबंधी प्रायश्चित्ताचे विधान आहे. प्रायश्चित्ताचे महत्त्व, आत्मशुद्धी अथवा अंतःपरिष्काराची उपोदयता ह्या विषयांचे ह्यात प्रतिपादन केले आहे.
'प्रायश्चित्त' समास दोन शब्दांच्या योगाने निष्पन्न होतो. प्राय: चा अर्थ 'पाप' आहे आणि 'चित्त' याचा अर्थ 'विशोधन करणे' असा आहे.
'प्रायस्य पापस्य चितं विशोधनं' अर्थात पाप शुद्ध करण्याच्या क्रियेचे नाव प्रायश्चित आहे. “प्राय: नाम तपः प्रोक्तं चित्तं निश्चय उच्येत, तेंपानिश्चय संयोगात् प्रायश्चित्तमितीर्यते"४४ (रघु. १२/१९)
ह्याच्यात प्रायश्चिताच्या दहा भेदांचे विवेचन आहे. १) आलोचना २) प्रतिक्रमण ३) मिश्र-आलोचना-प्रतिक्रमण ४) विवेक ५) व्यूत्सर्ग ६) तप ७) छेद ट) मूळ ९) अनवस्थाप्य १०) पारांचिक पिंडनिज्जुत्ति, ओहनिज्जुत्ति पिण्डनिर्युक्ती, ओघनिर्युक्ती
'पिंड' शब्द जैन पारिभाषिक दृष्टीने भोजनाचा वाचक आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये आहार एषणीयता, अनेषणीयता इत्यादी संदर्भात उद्गम इत्यादी दोष आणि श्रमण जीवनाच्या आहार, भिक्षा इत्यादी गोष्टींबद्दल विस्तृत विवेचन आहे.
दशवैकालिकाच्या पाचव्या अध्ययनाचे नाव 'पिण्डैषणा' आहे. ह्या अद्ययनांवर आचार्य भद्रबाहु यांची नियुक्ती अत्यंत विस्तृतपणे झाली आहे. त्यामुळे ह्याला 'पिंडनियुक्ती' नावाने स्वतंत्र आगमाच्या रूपात स्वीकारले आहे.
ओघनिर्युक्ती 'ओघ'चा अर्थ प्रवाह, सातत्य, आणि ओघनिर्युक्ती' म्हणजे परपरेने प्राप्त उपदेश' असा अर्थ होतो. जसे पिंडनियुक्तीमध्ये साधूच्या आहाराविषयी विवेचन आहे त्याचप्रमाणे ह्यात साधूच्या जीवनाशी सबधित अ
चप्रमाण ह्यात साधूच्या जीवनाशी संबंधित आचार व्यवहार याविषयी
थोडक्यात विवेचन आहे.
पिडनियुक्ती ज्याप्रमाणे दशवैकालिक नियुक्तीचा अंश मानला जातो