________________
(७२)
गणिविज्जा -गणिविद्या - हा ज्योतिष विषयक एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. "गणि" शब्द गणाचे अधिपती अथवा आचार्यांच्या अर्थी आहे. संस्कृतमध्ये सदा गणिन् शब्द ह्याच अर्थाने घेतला आहे. ह्या प्रकीर्णकाच्या नावाच्या पूर्वार्धात जो गणि' शब्द आहे तो गणनायकाच्या अर्थाने घेतलेला नाही. 'गणि' शब्दाची दसरी व्युत्पत्ती सुद्धा आहे. 'गण' धातूला 'इन्' प्रत्यय लावल्याने गणनाच्या अर्थी 'गणि' शब्द येतो. येथे तोच अर्थ अभिप्रेत आहे. कारण प्रस्तुत प्रकीर्णकामध्ये गणना संबंधी विषय वर्णित आहे.
ह्याच्यात दिवस तिथी, नक्षत्र, करण, ग्रहदिवस, मुहूर्त, शकुनबळ, लग्नबळ निमित्तवळ इत्यादी ज्योतिष संबंधी विषयांचे विवेचन आहे.
२) देविंदथव-देवेंद्रस्तव - ह्याच्यामध्ये बत्तीस देवेंद्राचे विस्तृत वर्णन आहे. ग्रंथांच्या सुरुवातीला कोणी श्रावक भगवान ऋषभदेवापासून चोवीसाव्या महावीर स्वामी तीर्थकरांपर्यंत सगळ्यांची स्तुती करताना सांगतो. तीर्थकर बत्तीस इंद्रांकडून पूजिलेले आहेत.' श्रावकाची पत्नी हे ऐकून जिज्ञासा प्रस्तुत करते की बत्तीस इंद्र कोणकोणते आहेत ? कसे आहेत ? कोठे राहतात ? कोणाची स्थिती कशी आहे ? भवन परिग्रह अर्थात त्यांच्या अधिकारात भवन अथवा विमान किती आहेत ? नगर किती आहेत? तिथल्या पृथ्वीची लांबी आणि रुंदी किती आहे ? त्या विमानाचे रंग कसे आहेत ? आहाराचा काळ किती आहे ? श्वासोच्छवास कसे आहेत ? अवधीज्ञानाचे क्षेत्र किती आहे ? इत्यादीविषयी मला सांगा.
श्रावकाने तिच्या शंकेचे निरसन करताना देवता इत्यादींचे जे वर्णन केलेले आहे तोच ह्या प्रकीर्णकाचा वर्ण्य विषय आहे.
ह्याच्यात बत्तीस इंद्राचा उल्लेख करण्यास सांगितले आहे. परंतु त्यापेक्षा अधिक प्रमाणात इंद्राविषयी येथे चर्चा केलेली आहे.
। १०) वीरत्थओ वीरस्तुती - ह्या प्रकीर्णकाऐवजी डॉ. मुनी नगराज आणि आचार्य देवेंद्रमुनी महाराजांनी मरणसमाधी प्रकीर्णकाचा उल्लेख केला आहे. ज्याचे विवेचन पुढे करण्यात येईल.
आगमदीप प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेल्या पंचेचाळीस आगमांच्या गुर्जर छायमध्ये वीरत्थओ प्रकीर्णक घेतले आहे. त्याच्या त्रेचाळीस गाथा आहेत. सुरवातीला
साला नमस्कार करून त्याच्या नावाने त्याची स्तती केलेली आणि त्या त्या
वीर जिनेश्वराला नमस्कार करून त्याच्या