________________
(७६)
भावनेच्या ह्या मूळ स्रोताने आगमातून प्रवाहित होत होत उत्तरवर्ती साहित्यामध्ये विशाल नदीचेच रूप धारण केले. याचे विभिन्न प्रसंगी कोठे सांकेतिक, कोठे संक्षिप्त तर कोठे विस्तृत रूपात वर्णन झालेले आहे. पुढील प्रकरणात या विषयाबाबत विस्तृत विवेचन केले जाईल.