________________
(६८)
जैन पारिभाषिक दृष्टीने तीर्थंकरांचे जे शिष्य आपल्या उपजतबुद्धीनुसार श्रमणाद्वारे अध्यात्मासंबंधी विविध विषयावर ग्रंथ रचत होते त्यांना 'प्रकीर्णक' असे म्हटले जाते.
असे म्हटले जाते की ज्या तीर्थंकरांचे औत्पातिकी, वैनयिकी, कार्मिकी आणि पारिणामिकी ह्या चार प्रकारच्या बुद्धीने युक्त जेवढे शिष्य होतात त्यांचे तितकेच सहस्र प्रकीर्णक असतात. जितके प्रत्येकबुद्ध होतात त्यांचेही तितकेच प्रकीर्णक ग्रंथ असतात.
प्रत्येकबुद्ध प्रव्रज्या देणाऱ्यांच्या दृष्टीने कोणाचे शिष्य होत नाही. परंतु तीर्थंकरांद्वारे उपदिष्ट धर्मशासनाची प्ररूपणा करण्याच्या अपेक्षेने अथवा त्यांच्या शासनात राहत असल्याने त्यांना औपचारीकतेने तीर्थंकरांचे शिष्य म्हटले जाते म्हणून प्रत्येकबुद्धांद्वारे प्रकीर्णकाची रचना मानणे युक्तिसंगत आहे.
वर्तमानकाळात सर्वमान्य दहा प्रकीर्णकामधील एकेका प्रकीर्णकाचा येथे थोडक्यात परिचय दिला जाईल.
१) चउसरण चतुःशरण प्रकीर्णक
जैन परंपरेमध्ये अरिहंत, सिद्ध, साधू आणि सर्वज्ञ निरूपित धर्माला शरणरूप मानलेले आहे. ह्या चार शरणांच्या आधारावर ह्या प्रकीर्णकाचे नाव चतुःशरण ठेवले आहे.
-
ह्या प्रकीर्णकाच्या प्रारंभी 'षडावश्यक' यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यात लिहिले आहे:
१) सामायिक आवश्यकाने चारित्र्याची शुद्धी होते.
२) चतुर्विशंती जिनस्तवनाने दर्शनशुद्धी होते.
३) वंदना केल्याने ज्ञानामध्ये निर्मळता येते.
४) प्रतिक्रमण केल्याने ज्ञान, दर्शन, इत्यादी रत्नत्रयाची शुद्धी होते.
५) कायोत्सर्गाने तपाची शुद्धी होते आणि प्रतिक्रमण केल्यानेही जर चारित्र्याची शुद्धी झाली नसेल तर त्याची सुद्धा शुद्धी कायोत्सर्गाने होते.
६) पच्चक्खाण केल्याने वीर्य शुद्धी होते.
यानंतर तीर्थंकरांची माता ज्या चौदा स्वप्नांना पाहते त्याचा उल्लेख करून महावीर स्वामींना वंदन करून चार शरणांचे विस्तृत विवेचन केले आहे. त्यात