________________
कायोत्सर्गामध्ये समाधिस्थ होतो. अंतरात्मभावनेत स्थिर होतो. 'मी शरीर नाही, मी आत्मा आहे' असे चिंतन, अनुचिंतन, अनुभावन करतो. कायोत्सर्गाचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे त्या विषयांच्या ग्रंथांमध्ये विस्तृत विवेचन झालेले आहे.
प्रत्याख्यान - हा सहावा आवश्यक निर्देश आहे. प्रत्याख्यान म्हणजे 'त्याग', म्हणजे मिथ्यात्व, अज्ञान, असंयममूलक भावनेचा त्याग करणे होय. तसेच बाह्य भोग्य पदार्थांचा त्याग करणे असाही आहे. यांनाच क्रमशः भाव प्रत्याख्यान आणि द्रव्य प्रत्याख्यान म्हटले जाते. प्रत्याख्यान म्हणजे गुणांचे ग्रहण करणे. हे व्रतरूपी गुणांचे संमार्जन आहे. ह्याचे प्रयोजन दुष्प्रवृत्तींचा निरोध आणि सत्प्रवृत्तींचा स्वीकार करणे आहे. त्यामुळे इच्छानिरोध, तृष्णात्याग इ. गुणांची वृद्धी होते.
प्रकीर्णक आगम साहित्य - श्वेतांबर मूर्तिपूजक संप्रदायामध्ये पंचेचाळीस आगम स्वीकारलेले आहेत. श्वेतांबर स्थानकवासी आणि तेरापंथी संप्रदायामध्ये पूर्वी ज्यांचे विवेचन केलेले आहे अशी अकरा अंग, बारा उपांग, चार छेद, चार मूळ आणि एक आवश्यकसूत्र असे बत्तीस आगम प्रमाणरूपाने स्वीकारले जातात. ह्या बत्तीस आगमांना मूर्तिपूजक संप्रदायही मानतो. पण ते मूळ सूत्रामध्ये 'पिण्डनियुक्ति याचे दूसरे नाव ओघनियुक्ति आहे, छेदसूत्रात, महानिशीथ, पंचकल्प आणि दहा प्रकीर्णक असे तेरा आगम मिळविले असता पंचेचाळीस आगम मानतात.
नंदीसूत्राचे टीकाकार आचार्य मलयगिरी ह्यांच्या मतानुसार तीर्थंकरांद्वारे उपदिष्ट "श्रुत'चे अनुकरण करून श्रमण प्रकीर्णकांची रचना करतात. प्रकीर्णक इतस्ततः विखुरलेल्या सामग्रीचा अथवा विविध विषयांचा संग्रह होय.
श्रमण भगवान महावीरांच्या तीर्थामध्ये चौदा हजार प्रकीर्णक मानले जात होते, परंतु आज त्यांची संख्या दहा आहे. ते खालीलप्रमाणे
१) चतुःशरण २) आतुरप्रत्याख्यान ३) महाप्रत्याख्यान ४) भक्त परिज्ञा ५) तंदुलवैचारिक ६) संस्तारक ७) गच्छाचार ८) गणविद्या ९) देवेंद्रस्तव १०) मरण समाधी. (अन्यत्र ह्याचे 'वीरत्थओ' असेही नाव आहे.)
परंतु ह्या नावांमध्ये समानता दिसून येत नाही. काही ठिकाणी तर मरणसमाधी' आणि 'गच्छाचार' यांच्या जागी 'चंद्रवेध्यक' आणि 'वीरस्तव' घेतले आहे, तर कोठे 'देवेंद्रस्तव' आणि 'वीरस्तव' घेतले आहे. परंतु काही ठिकाणी संस्तारक याच्या जागी 'गच्छाचार' किंवा 'मरणसमाधी' याचा उल्लेख आलला आह.