________________
६) प्रत्याख्यान.
ह्या सत्रामध्ये सांगितलेले निर्देश नित्य आणि अवश्य (नित्यमेव अवश्यमेव) करावयाचे असल्याने ह्या सूत्राला 'आवश्यक सूत्र' असे नाव दिलेले आहे.
सामायिक - सामायिक प्रथम आवश्यक आहे. हे सावद्ययोग, प्रत्याख्यान, त्याग आणि वैराग्य प्राप्त करण्याचे प्रतिज्ञासूत्र आहे. सामायिकामध्ये साधू विषम भावनेचा त्याग करतो आणि समभावनेचा अंगीकार करतो. राग आणि द्वेष आत्मस्वरूपाचे विपरीत भाव आहेत. त्यामुळे साधक सावद्यप्रवृत्तीशी (पापयुक्त प्रवत्तीशी) संयुक्त होतो. सामायिकामध्ये त्यागाचा आंतरिक संकल्प असल्याने साधकामध्ये आत्मबळाचा संचार होतो आणि समानतेची भावना दृढ होते.
चतुर्विंशतिस्तव - चोवीस तीर्थंकर हे साधकांसाठी आदर्श आहेत, त्यांची स्तुती केल्याने, त्यांचे स्तवन केल्याने त्यांच्या ठिकाणी असलेले गुण आपल्या जीवनात उतरवून उच्च स्थानावर किंवा मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळते.
वंदना - साधकांच्या जीवनात तीर्थंकरानंतर आपल्या गुरुंचे स्थान महत्त्वाचे आहे. तिसऱ्या आवश्यकामध्ये गुरू वंदनेचे विधान केलेले आहे. साधकाच्या मनात गुरुभक्तीची भावना, सदगुरुंविषयी आदराची भावना इ. वंदनेच्या अंतर्गत आहे.
__ प्रतिक्रमण - हा जैन परंपरेतील अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. 'स्वभावापासून विभाव दशेत जाणाऱ्या आत्म्याला पुन्हा स्वतःच्या म्हणजे 'स्व' मध्ये आणणे स्वतःजवळ वळवणे, आपल्या स्वरूपामध्ये येणे म्हणजेच प्रतिक्रमण होय. हे केवळ बाह्य शब्दातच सीमित नसून अंतर्भावामध्ये ही एक अशी अवस्था आहे, ज्यात मन बाह्यात्मभावाला सोडून अंतरात्मभावामध्ये येण्यासाठी उद्विग्न होते. कुमार्गावरून सन्मार्गावर येण्यासाठी उद्युक्त होते. हे आत्माविष्काराचे अत्यंत सार्थ रूप आहे.
कायोत्सर्ग - 'काया' आणि 'उत्सर्ग' हे दोन शब्द मिळून 'कायोत्सर्ग' असा शब्द बनलेला आहे. उत्सर्ग शब्दाचा अर्थ 'त्याग' असा आहे. शरीराचा कोणीच त्याग करू शकत नाही. मनुष्याचे जितके आयुष्य निर्धारित असते तोपर्यंत शरीर हे त्याच्याबरोबर असणारच. परंतु शरीराबद्दल जी ममत्व भावना किंवा आसक्ती असते, ती साधकाला साधना पथावरून विचलित करत असते, तिचा त्याग (म्हणजे उत्सर्ग) करणे म्हणजेच कायोत्सर्ग होय. दैहिक आणि आत्मिक अशी दोन प्रकारची बुद्धी असते. दहिक भावनेचा त्याग आणि आत्मभावनेत लीन होण्याचे बळ मिळविण्यासाठी साधक