________________
(६५)
दक्ष राहण्याचा संकेत केलेला आहे. आलोचना आणि प्रायश्चित विधानाचे आणि संघ व्यवस्थेच्या नियम, उपनियमाचे ह्यात विस्तृत विवेचन आहे. तसेच दहा प्रकारच्या वैयावृत्य सेवाकार्याचा सुद्धा ह्यात उल्लेख आहे.
साधूंचे निवासस्थान, शास्त्राध्ययन, चर्या, उपधान इ. तपस्येचे विस्ताराने वर्णन झालेले आहे.
निशीथ सूत्र - ‘निशीथ' म्हणजे अर्थरात्र, जी अतिशय अंधकारमय असते. अती अंधकार म्हणजे प्रकाशापासून अंधाराकडे जाणे. साधुसाध्वी जेव्हा नियम तोडतात तेव्हा त्यांचे हे कार्य अंधकाराच्या दिशेने जाण्यासारखे आहे. प्रकाश ज्ञानाचे प्रतिक •आहे. साधुसाध्वींचे जीवन नेहमी पवित्र राहावे, त्यांच्यात क्षणोक्षणी जागरुकता राहावी हे अपेक्षितच आहे.
निशीथ सूत्राला आचारांग सूत्राच्या द्वितीय चूलेच्या रूपात स्वीकारले जाते. ह्याचे एक नाव 'आचार कल्प' असेही आहे. ह्यात साधुसाध्वींच्या आचाराविषयी नियमसुद्धा सांगितलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या उत्सर्ग आणि अपवादमार्ग यांचेही वर्णन आहे. साधुसाध्वींनी कशाप्रकारे व्यवहार करावा याची उत्सर्गमार्ग अपवादमार्गाच्या दृष्टीने चर्चा आहे. त्याचप्रमाणे येथे आचारांचा नियमभंग झाल्यावर त्यानुसार कसे प्रायश्चित दिले पाहिजे ह्याचेही विवेचन केलेले आहे. हे सूत्र बीस उद्देशकामध्ये विभक्त आहे. ह्याच्या प्रथम उद्देशकामध्ये ब्रह्मचर्य पाळण्याच्या दृष्टीने साधकांना विशेषरूपाने जागृत केले आहे. कुकर्मापासून दूर राहण्यास सांगितले आहे, ज्यामुळे संयमी जीवनाचा नाश होतो. अशा विविध प्रायश्चित्ताच्या विधिक्रमांचा उल्लेख आहे. ह्या सूत्राचे अध्ययन प्रायश्चित देणाऱ्या आचार्यासाठी आवश्यक आहे. याच्या अध्ययनामुळे कोणत्या प्रायश्चित्तासाठी कसा व किती दंड द्यावा हे त्यांच्या लक्षात येईल.
आवश्यक सूत्र - जैन आगमामध्ये आवश्यकसूत्राचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवनामध्ये संयमाचे चांगल्याप्रकारे पालन करण्यासाठी श्रमणाला नेहमी जागरूक राहण्याची आवश्यकता असते. जरी त्याने संसाराचा त्याग केलेला असला तरी मन चंचल असल्याने कोणत्याही स्थितीत तो मार्गच्यूत होण्याचीच शक्यता अधिक असते. जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती येतच राहते, म्हणून श्रमण आणि श्रमणोपासकांसाठी दररोज करण्याचे सहा आवश्यक निर्देश दिलेले आहेत. ते असे
१) सामायिक २) चतुर्विशतिस्तव ३) वंदना ४) प्रतिक्रमण ५) कायोत्सर्ग