________________
(६४)
बाकीच्या विभागाला 'दशा' म्हटले आहे.
ह्या सूत्राच्या प्रारंभीच अब्रह्मचर्य विषयक कर्म, रात्री भोजन, राजपिंडग्रहण साठी आणि एका महिन्यामध्ये एका गणाचा परित्याग करून दुसऱ्या गणामध्ये जाणाऱ्यांसाठी कोणकोणते प्रायश्चित आहे त्याचा उल्लेख यात आलेला आहे. ह्याच्या चौथ्या दशेत आचार्यांशी संबंधित आठ संपदेची चर्चा केलेली आहे, ज्यात आचार, श्रत, शरीर, वाणी, वाचन, मती, प्रयोगमती आणि संग्रह या संपदेचा समावेश आहे.३९ ह्याचे विस्तृत वर्णन ह्या आगमात प्राप्त होते. आठव्या अध्ययनात भगवान महावीरांच्या पंचकल्याणकाचे व त्यांच्या जीवनचरित्राचे वर्णन आहे. ह्या अध्ययनामध्ये भाषेची प्रौढता व शैलीची काव्यात्मकता दिसून येते. ह्यात क्रियावाद, अक्रियावाद इ. मिथ्या संप्रदायाचे वर्णन आहे. ह्यातच पुढे भ. ऋषभदेव, अरिष्टनेमी आणि भ. पार्श्वनाथांच्या चरित्राचा संकेत केलेला आहे.
। बृहत्कल्पसूत्र - ह्या सूत्रात जैन साधूंच्या आचारसंहितेचे व आचारशास्त्राचे विवेचन आहे. भाषेच्या दृष्टीने हे शास्त्र प्राचीन मानलेले आहे. ह्यात सहा उद्देशक आहेत, ज्यात त्या त्या स्थानाचे वस्त्र आणि पात्र इत्यादींचे वर्णन केलेले आहे, जे साधुसाध्वीच्या संयमपालनात सहायक आणि बाधक ठरले आहे. साधू व साध्वी यांनी कोणत्या ठिकाणी निवास केला पाहिजे, ह्याचे विस्तृत वर्णन येथे केलेले आहे. ह्यात विहार संबंधी नियमसुद्धा सांगितले आहेत. कोणत्या परिस्थितीत साधुसाध्वी यांनी परस्परांना मदत करावी हेसुद्धा सांगितलेले आहे. ह्याचे रचनाकार आचार्य भद्रबाहु मानले जातात, जे दशाश्रुतस्कंधाचे रचयिता आहेत.
व्यवहार सूत्र - याची रचना चतुर्दशपूर्वधारी आचार्य भद्रबाहूंनी केली अशी मान्यता आहे. ह्यावर भाष्य आणि नियुक्तिची सुद्धा रचना झालेली आहे. हे सूत्र दहा उद्देशकामध्ये विभक्त आहे. ह्यात सांगितलेले आहे की अज्ञानवश अथवा प्रमादवश कोणतेही पाप घडले तर आलोचना आणि प्रायश्चित केले पाहिजे. अनेक प्रकारच्या क्रिया होतात. ज्या निंद्यनीय आहेत त्यांचे कसे प्रायश्चित घ्यावे यासंबंधी प्रतिपादन कल आहे. साधुसाध्वीच्या भिक्षाव्यवहारासंबंधी, अनेक नियम ह्यात वर्णिलेले आहेत.
- आचार्यांचे चार प्रकार, अंतेवासी शिष्यांचे चार भेद, स्थविरांचे तीन भेद इत्यादींचेही वर्णन केलेले आहे. स्वाध्याय करण्याची विशेषत्वाने प्रेरणा दिलेली आहे.
स्वाध्याय योग्य काळातच व्हायला पाहिजे. अयोग्य काळात होणार नाही ह्याबद्दल
i shasa
kutah
SPEOPORNE MAHAR