________________
भाषा आणि विषयाच्या दृष्टीने विद्वानांच्या मतानुसार हे अर्वाचीन मानले गेले आहे. शाच्यावर 'जीनदासगणी महत्तर' यांनी 'चुर्णी'ची रचना केली आणि आचार्य हरीभद्र सरी यांनी त्याचप्रमाणे मलधारी हेमचंद्रांनी टिकेची रचना केलेली आहे. मलधारी
वाचार्य अभयदेवसूरीचे शिष्य होते अशी मान्यता आहे. ह्या आगमामध्ये सोनौलीत पल्योपम, सागरोपम इत्यादींचे आणि प्रमाण, नय निक्षेप, नऊ काव्यरस यांचा उल्लेख आहे. तसेच संगीतशास्त्राच्या स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादींचे सुद्धा वर्णन आहे.
ह्यात व्याकरणसंबंधी सुद्धा चर्चा आलेली आहे. धातू, नियुक्ति, समास, तद्धित इत्यादींचे विस्तृत विवेचन केलेले आहे.
प्रमाणाच्या विवेचनांतर्गत त्याचे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि आगम हे चार भेद दाखविले आहेत. अनुमानाचे सुद्धा पूर्ववत्, शेषवत् आणि दृष्टसाधर्म्य हे तीन भेद सांगितले आहेत.
छेदसूत्र - 'छेद' शब्दाचा अर्थ छिन्नविच्छिन्न करणे, कापून टाकणे, नष्ट करणे असा आहे. संन्यासी जीवनात सुद्धा दोष लागणे शक्य आहे कारण साधू सुद्धा एक छद्मस्य मानव आहे. परंतु दोष लागल्यानंतर तिकडे दुर्लक्ष करणे, असावधपणे राहणे त्यामुळे दोषपरंपरा वाढत जाऊन साधू आपल्या स्थानापासून च्यूत होत जातो. अशाप्रकारे त्याचे पतन होऊ लागते. साधूने आपल्या संयमाच्या मार्गावर स्थिर राहण्यासाठी प्रायश्चित घेऊन आपल्या दोषांना छिन्न करून टाकणे किंवा कापून टाकणे अत्यंत आवश्यक असते. छेदसूत्रामध्ये ह्याच संदर्भात विविध विधिक्रमाचे प्रतिपादन' केलेले आहे.
दशाश्रुतस्कंध - 'आचार्य भद्रबाहू' यांनी या आगमाची रचना केली असे मानले जाते. येथे एक प्रश्न उपस्थित होतो की नियुक्तिकार' भद्रबाहु आणि दशाश्रुतस्कंधाचे' रचयिता एकच होते की वेगवेगळे ? विद्वानांच्या मते हे दोन्ही वेगवेगळे होते. भद्रबाहू नावाचे अनेक आचार्य होऊन गेले म्हणून ऐतिहासिक दृष्टीने ह्यासंबंधी काही सांगता येत नाही. ह्यावर ब्रह्मर्षी पार्श्वचंद्रिय यांनी संस्कृतमध्ये वृत्तीची रचना केलेली आहे.
ह्या आगमाचे दुसरे नाव 'आचार दशा' असे सुद्धा आहे. ह्यात दहा विभाग Med. त्यातील आठव्या व दहाव्या विभागाला 'अध्ययन' असे नाव दिले असन