________________
अरिहंत, सिद्ध, साधू आणि धर्माची महानता दाखवून त्याचे गुण किर्तन पूर्वी केलेल्या पापाची निंदा आणि सत्कृत्याचे अनुमोदन केले आहे.
२) आउर पच्चक्खाण - आतुर प्रत्याख्यान प्रकीर्णक - हे प्रकीर्णक मृत्यूशी संबंधित आहे. म्हणून ह्याला 'अंतकाळ प्रकीर्णक' असेही म्हणतात. ह्यात बालमरण आणि पंडित मरण यांचे विवेचन आहे. ज्याची स्थिती जवळ जवळ आतुरावस्थेत होते. आतुर शब्द सामान्यपणे 'रोग' वाचक आहे. म्हणूनच ह्या प्रकीर्णकाचे नाव 'आतुर प्रत्याख्यान' असे ठेले असावे.४२
- ह्यात लिहिले आहे की, जे मृत्यूच्यावेळी धीट बनून प्रत्याख्यान करतात ते मृत्यूनंतर उत्तम स्थानाला प्राप्त करतात.४३ ह्यात प्रत्याख्यानाला शाश्वत गतीचे साधन सांगितले आहे.
S
३) महापच्चक्खाण महाप्रत्याख्यान प्रकीर्णक - ह्या प्रकीर्णकामध्ये पाप आणि वाईट चारित्र्याची निंदा करून त्याच्या प्रत्याख्यानावर जोर दिलेला आहे. त्याग अथवा प्रत्याख्यानाला जीवनाच्या यथार्थ सफलतेचे परिपोषक मानले आहे. ह्याच्या आधारावरच धर्माचरण टिकून आहे. त्यागाच्या महान आदर्शाचा ह्यात विशेषरूपाने उल्लेख झाला आहे. म्हणून ह्याचे नाव महाप्रत्याख्यान ठेवले असावे असे वाटते.
___पौद्गलिक भोगाचा मोह मनुष्याला संयमित जीवन स्वीकारू देत नाही. पौदगलिक भोगाने प्राणी कधीच तृप्त होत नाही, परंतु संसाराची वृद्धी होते. ह्याविषयी ह्यात विवेचन केले आहे आणि मायेचा त्याग, तितिक्षा आणि वैराग्याचे हेतू, पाच महाव्रते, आराधना इत्यादी विषयांचेही वर्णन केलेले आहे.
४) भत्त परिण्णा-भक्त परिज्ञा प्रकीर्णक - जैन धर्मामध्ये भक्तपरिज्ञा अनशनपूर्वक मरणाच्या प्रकारातला एक प्रकार आहे. आतुरप्रत्याख्यानामध्ये साधक रुग्णाववस्थेमध्ये आमरण अनशन स्वीकारून पंडित मरण प्राप्त करतो. भक्त परिक्षेची स्थिती ह्यापेक्षा थोडी वेगळी आहे. ह्यामध्ये शारीरिक अस्वस्थतेचा विशेष संबंध नाही. सदसद्विवेकपूर्वक साधक आमरण अनशनाद्वारे देहत्याग करतो.
ह्या प्रकीर्णकामध्ये अन्य अनेक विषयांबरोबर भक्त परिक्षेचे विशेषरूपाने वर्णन आहे म्हणून ह्याचे नाव भक्तपरिज्ञा ठेवले आहे. ह्यात 'इंगित' आणि 'पादोपगमन' मृत्यूचे सुद्धा विवेचन आहे; जे भक्तपरिज्ञेप्रमाणे विवेकपूर्वक अशन त्यागाद्वारे प्राप्त हाणाऱ्या मरणाचे भेद आहेत. अशा कोटीच्या पंडितमरणाचे तीन प्रकार मानलेले आहेत.
t
disonme