________________
VAN
तापस धर्माच्या विधि विधानाचे पालन केले. शेवटी आपल्या धर्मानुसार महाप्रस्थान करून देह सोडण्याचा निश्चय केला.
पुष्पचूला - ह्यात दहा अध्ययने आहेत. सौधर्म कल्पामध्ये निवास करणाऱ्या श्रीदेवी ही देवी इत्यादींचे कथानक यात आहे. ज्या आपल्या पूर्वभवामध्ये भ.पार्श्वनाथांच्या शिष्या होत्या. ज्यांनी पुष्पचूलिकाजवळ दीक्षा घेतली होती. परंतु त्या बाह्यशचित्व आणि शारीरिक शुद्धी इत्यादींमध्ये आसक्त होत्या, जे साध्वी जीवनाच्या दृष्टीने योग्य नव्हते. ह्या आगमात लिहिल्याप्रमाणे सर्व देवी देवलोकातील आयुष्य पूर्ण करून महाविदेह क्षेत्रात जन्म घेऊन संयमाची आराधना करून सिद्धी प्राप्त करतील.
वृष्णिदशा - नंदीसूत्राच्या चूर्णीमध्ये ह्या उपांगांचे नाव 'अंधकवृष्णि' लिहिले आहे. कालांतराने 'अंधक' शब्द नष्ट होऊन 'वृष्णिदशा' एवढाच शब्द राहिला. ह्यात बारा अध्ययने आहेत. ज्यात वृष्णिवंशीय अथवा यादवकुलोत्पन्न बारा राजकुमारांचे वर्णन आहे. ज्यांनी दीक्षा घेतली होती.
द्वारका नगरीचा राजा श्रीकृष्ण आणि बावीसावे तीर्थंकर भ. अरिष्टनेमीचे सुद्धा ह्या आगमामध्ये विशेषरूपात वर्णन झाले आहे. ते वाचनीय आहे. ह्यात यदुवंशीय राजाचे जे इतिवृत्त लिहिलेले आहे ते भागवतामध्ये वर्णिलेल्या चरित्राबरोबर तुलनीय
आहे.
उपांगांचे सारांश - येथे वर्णिलेले अंग, उपांग, सध्याच्या अवसर्पिणी काळाचे तीर्थकर भ. महावीरांच्या देशनेशी संबंधित मानले जातात. वाचनेच्या वर्णनामध्ये हे दाखवलेले आहे की, 'श्रुत' ची परंपरा श्रुतिच्या आधारावर चालत होती, स्मृति दुर्बलतेमुळे आगमाचे लेखन झाले. येथे असा प्रश्न उपस्थित होतो की भगवान महावीरांनी आपल्या जीवनामध्ये जो धर्मोपदेश दिला तो सर्व अंग, उपांग आगमात संकलित केलेला आहे ? ह्याच्यावर विद्वान चिंतक, विचार विमर्श करत राहिले. गणधरांनी ज काही संकलित केलेले होते ते उत्तरवर्ती मुनींच्या स्मृतीत जसेच्या तसे राहण्याबाबत संशय निर्माण झाला. परंतु त्याचा आगमांच्या रूपात जेवढा भाग उपलब्ध आहे तो अवश्य महत्त्वपूर्ण आहे.
नवांगी टीकाकार आचार्य अभयदेवसूरींनी आगमाच्यासंबंधी पाठभेदाचा उल्लेख केला आहे. वेगवेगळ्या वाचने मध्ये सुद्धा काही ठिकाणी पाठभेद आहे. अलव्याकरणसूत्राविषयी नंदीसत्रामध्ये जसे वर्णन आलेले आहे तसे त्याचे सध्या स्वरूप