________________
(५९)
तथ्य असल्याचे वाटत नाही. हे कथन काल्पनिक वाटते.
_ निरयावलिका - ह्याच्या अंतर्गत कल्पावतंसिका, पुष्पिका, पुष्पचूला आणि विष्णदशा ही पाच उपांगे येतात. विद्वानांच्या मते ही पाच उपांगे पूर्वी एका निरयावलिशाच्या नावाने एकाच ग्रंथाच्या रूपात प्रसिद्ध होती परंतु असे झाले तर उपांगांची संख्या बारा होत नाही. अंगांप्रमाणे उपांगांची संख्या सुद्धा बारा करण्यासाठी निरयावलिकाच्या अंतर्गत असलेले कल्पावतंसिका इ. वेगवेगळ्या उपांगांच्या रूपात परिणत केले असावे.३७
- ह्या पाच उपांगांचा संक्षिप्त परिचय असा आहे.
निरयावलिका अथवा कल्पिका - ह्यात दहा अध्ययने आहेत. 'निरय' चा प्राकृत अर्थ 'नरक' असा होतो. ह्यातच नरकातील जीवांचे वर्णन असल्याने हे उपांग निरयावलिका नावाने प्रसिद्ध आहे. ह्यात मगधदेशाच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन आहे. पिता-पुत्रांच्या मनातील कलुषिता आणि संपत्तीसाठी भावांचे होणारे युद्ध इ. वर्णन वाचले तर संसाराच्या विचित्रतेचे ह्यात स्पष्ट दर्शन होते.
कल्पावतंसिका - ह्यात दहा अध्ययने आहेत. ज्यात राजाश्रेणिकेच्या दहा नातवांची कथा आहे, ज्यांनी श्रमण दीक्षा घेतली आणि आत्मसाधनेद्वारा आयुष्य पूर्ण करून देवलोकामध्ये गेले. तेथून मनुष्य जन्म घेऊन मोक्षास जातील अशाप्रकारे व्रताचरणाद्वारे जीवनशुद्धीवर अधिक प्रकाश टाकला आहे.
_ पिता जेथे क्रोधादि कषायांच्या वशीभूत होऊन नरकात जातात तेथे पुत्र सत्कर्मामुळे स्वर्ग प्राप्त करतात. म्हणजे उत्थान आणि पतन ह्यांचे दायित्व मानवाच्या स्वकर्मावर आधारलेले आहे. मानव साधनेद्वारा देवत्वसुद्धा प्राप्त करू शकतो. परंतु विराधनेद्वारे भिकारी सुद्धा बनतो. कर्माची दशा समजण्यासाठी हे आगम अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुष्पिका - ह्यात सुद्धा दहा अध्ययने आहेत. ह्याच्या तिसऱ्या अध्ययनात सोमील ब्राह्मणाची कथा आहे. तो विविध शास्त्रांचा पंडित होता. भ. पार्श्वनाथांचे उपदेश ऐकून तो श्रावक बनला. त्यानंतर त्याच्या विचाराचे परिवर्तन झाले आणि तो सम्यक्त्वाने विचलित झाला. त्याने पुन्हा स्वतःचे ब्राह्मण धर्मोचित जीवन स्वीकारले. आव्याच्या झाडाचे बगीचे लावले. नंतर त्यांनी आपल्या मोठ्या पुत्राला कुटुंबाचे उत्तरदायित्व सोपवून तापसव्रत स्वीकारले. अनशन. आतापना इ. तपाचरण करत करत