________________
(५८)
पाहिजे. जर हे दोन वेगवेगळे ग्रंथ आहेत तर त्यांच्यामध्ये साम्य कसे असू शकेल ? आणि सर्याची व चंद्राची गती सारखीच आहे काय ? जर सारखीच आहे तर दोन आगमांना वेगवेगळे करण्याची काय आवश्यकता होती ? एकाच आगमाने काम झाले असते असे प्रश्न साहजिकच उत्पन्न होतात. दोन्हींमध्ये मात्र किंचित फरक आहे. सूर्यप्रज्ञप्तिच्या प्रारंभी प्राकृतच्या चार गाथांमध्ये मंगलाचरण आहे. मंगलाचरणानंतर "तेणं कालेणं तेणं समयेणं मिहिला नाम नयरी होत्था वण्णओ'' ह्या वाक्याने आगमाची सुरुवात होते.
चंद्रप्रज्ञप्तिमध्ये मंगलाचरणाच्या चार गाथा नाहीत तेथे 'तेणं कालेणं' ह्या वाक्यानेच आगमाची सुरुवात होते. नंतर दोघांमध्ये थोडासुद्धा फरक नाही. विद्वानांनी ह्यावर खूप संशोधन केले की पाठ एक असताना दोन्ही आगम वेगळे का मानले जातात?
- काही विद्वानांच्या मते ह्या दोन्ही आगमामधून एकाच असेल परंतु एखाद्या प्राचीन ग्रंथभांडारामद्ये सूर्यप्रज्ञप्तिच्या दोन प्रती असतील, एक प्रत मंगलाचरणासहित असेल आणि दुसऱ्या प्रतीतील मंगलाचरणाचे पृष्ठ हरवले असेल. 'तेण कालेणं' पासूनच सरळ पाठ चालला असेल.
ग्रंथभांडाराची देखरेख करणाऱ्या कोण्या साधारण व्यक्तीने केवळ सुरुवातीचीच पाने पाहिली असतील पुढे पाहिले नसेल. ज्या प्रतीवर सूर्यप्रज्ञप्ति नाव लिहिलेले असेल आणि मंगलाचरण नसेल त्याला त्याने सूर्यप्रज्ञप्ति समजले असेल आणि दुसऱ्या प्रतीला चंद्रप्रज्ञप्ति मानून त्याच्यावर ते नाव लिहून टाकले असेल कारण सूर्यचंद्र नावे बरोबरच येतात.
SINERKातील
ह्या चुकीचा परिणाम असा झाला असावा की ह्यांना सूर्यप्रज्ञप्ति आणि चद्रप्रज्ञप्तिच्या रूपात वेगवेगळे मानले गेले असेल. एखाद्या विद्वानाच्या ध्यानात ही गोष्ट आलीही असेल व त्याने दोन्ही आगम भिन्न नसून एकच आहेत असेही सांगितले असेल. परंतु श्रद्धाळू लोकांना आगमाच्या संख्येमध्ये एक आगम कमी होणे कसे पटेल? म्हणून दोन्ही आगम सारखे असताना सुद्धा वेगवेगळे मानण्याची धारणा पुढे तशीच चालत राहिली.
काही विद्वानांच्या मते ह्यात शब्दांची समानता असली तरी अर्थाची भिन्नता आहे. बहुश्रुत आचार्यच ह्यातील भेद जाणत होते आणि ते आपल्या शिष्यांना समजावत होते. सर्वांनाच समजावून सांगणे ते योग्य मानत नव्हते. नरंतु ह्या म्हणण्यात काहीच
Stayestoms