________________
(५७)
NNERMANCE
SNORI
त्या त्या नावाने संबोधिले जात होते. पशुपक्ष्यांच्या अनेक प्रकारांचे ह्यात वर्णन येते. द्यात जरी अलंकारांचा प्रयोग कमी दिसत असला तरी जैन पारिभाषिक शब्दावलीचा प्रयोग विशेषत्वाने झालेला दिसतो.
- 'प्रज्ञापना' शब्दाचा अर्थ प्रकृष्ट अथवा विशिष्ट ज्ञान करून देणे असा होतो. ह्या सत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांचे विस्तृत ज्ञान उपरोक्त वर्णनाप्रमाणेच प्राप्त होते.
जम्बुद्विप प्रज्ञप्ति सूत्र - ह्या सूत्राला कोठे पाचवे उपांग मानले आहे तर कोठे सहावे.
'जम्बुद्विप प्रज्ञप्ति' दोन भागात विभक्त आहे. पूर्वार्धामध्ये चार आणि उत्तरार्धामध्ये तीन वक्षस्कार आहेत. एकूण एकशे शहात्तर सूत्रे आहेत. प्रथम चार परिच्छेदामध्ये जम्बूद्विप, भरतक्षेत्र तसेच तेथील पर्वत, नद्या आणि उत्सर्पिणी, अवसर्पिणी काळाचे निरूपण केलेले आहे. ह्याउपांगामध्ये कुलकरांचे कथन आहे तसेच ऋषभदेव भगवंताच्या चरित्राचे विस्तृत विवेचन आहे.
तीर्थंकराचा जन्मोत्सव, भरतचक्रवर्तीचा दिग्विजय, भरताच्या निर्वाण प्राप्तीचे प्रतिपादन यामध्ये केलेले आहे.
यात प्राचीन भूगोलाचे महत्त्वपूर्ण संकलन आहे. भरत आणि किरात यांच्या युद्धाच्या वर्णनाने प्राचीन युद्धशैलीचे स्मरण होते.
सूर्यप्रज्ञप्ति चंद्रप्रज्ञप्ति - ह्यात सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांची गती, विस्तारादींचे विस्तृत वर्णन येते. द्विप आणि सागराचे सुद्धा प्रसंगतः वर्णन आलेले आहे. ह्या ज्योतिष विषयासंबंधीचे विश्लेषण आहे. दोन सूर्य आणि दोन चंद्राचा सिद्धांत ह्यात वर्णिलेला आहे. ह्या दोघांचे भ्रमण एकानंतर एक एकांतर रूपात होते. म्हणून पाहणाऱ्या लोकांना सूर्य आणि चंद्र एकच एक दिसतात. ह्यात उत्तरायन व दक्षिणायनाचे सुद्धा वर्णन आहे.
___एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जरी हे दोन आगम असले तरी ह्या दोघामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत अक्षरशः एक सारख्याच पाठ आहे. असे असातांनाही त्यांना दोन आगमांच्या स्वरूपात का स्वीकारले आहे हा एक प्रश्नच आहे. आजही ह्याची गणना दोन वेगवेगळ्या आगमाच्या रूपातच होते.
'प्रज्ञप्ति' याचा अर्थ 'ज्ञान करून देणे' असा आहे. त्याप्रमाणे सूर्यप्रज्ञप्ति ही सूर्याची गती, विस्तारादीशी संबंधित आहे. चंद्रप्रज्ञप्ति चंद्राशी संबंधित असली
NROERESTINGirit