________________
जीव तत्त्वाचे ह्यात विस्तृत विवेचन आहे आणि अजीवतत्त्वाचे संक्षिप्त विवेचन आहे. जीवाची मुख्यता असल्याने ह्याला जीवाभिगम सुद्धा म्हणतात.
प्रस्तुत आगमामध्ये गणधर गौतम आणि भ. महावीरांच्या प्रश्नोत्तर रूपात जीव आणि अजीव यांच्या भेद-प्रभेदाचे विस्तृत वर्णन आहे. परंपरेच्या दृष्टीने ह्यात वीस उद्देशक होते, विसाच्या उद्देशकाची व्याख्या 'श्री शालिभद्रसूरी' यांचे शिष्य श्री चंद्रसूरींनी केली होती. अभयदेव सूरींनी ह्याच्या तिसऱ्या पदावर संग्रहणी लिहिली होती. । परंतु सध्या ह्या सूत्रात केवळ नऊ प्रकरणे आहेत, जी दोनशे बहात्तर सूत्रामध्ये विभक्त
आहेत. अशी शक्यता आहे की ह्या आगमाचा महत्त्वपूर्ण भाग लुप्त झाल्याने उरलेल्या भागाला नऊ प्रकरणाच्या रूपात संकलित केले असेल. उपलब्ध आगमामध्ये नऊ प्रकरणे, एक अध्ययन, अठरा उद्देशक आणि चार हजार सातशे पन्नास श्लोक प्रमाण पाठ आहेत. दोनशे बहात्तर गद्यसूत्र आणि एक्यांशी पद्य गाथा आहेत. ह्याचे दोन भागात निरूपण केले आहे. प्रथम विभागामध्ये अजीवाचे आणि संसारी जीवाचे निरूपण आले आहे आणि दुसऱ्या विभागामध्ये संसारी आणि सिद्ध दोन्ही प्रकारच्या जीवांचा समावेश होतो. ह्यात द्वीप आणि सागराचे सुद्धा विस्तृत विवेचन आहे.
ह्यात सांस्कृतिक सामग्रीची प्रचुरता आहे आणि कलेच्या दृष्टीने विपुल सामग्रीचे वर्णन केले. प्रश्नोत्तर प्रणालीचे ह्यामध्ये विकसित रूप प्राप्त होते.
प्रज्ञापना सूत्र - हे जैन आगम साहित्याचे चौथे उपांग सूत्र आहे. ह्याची रचना शामाचार्यांनी केली आहे. ह्या आगमाच्या पदांति "पण्णवणाए भगवईए'' असा पाठ मिळतो. त्यामुळे हे स्पष्ट होते की अंग साहित्यामध्ये जे स्थान भगवती सूत्राचे आहे तेच स्थान उपांगामध्ये प्रज्ञापना सूत्राचे आहे. ह्यात छत्तीस परिच्छेद आहेत. ज्यात जीवासंबंधी प्रज्ञापना, स्थान, बहुवक्तव्य, स्थिती, कषाय, इंद्रिय, लेश्या, कर्म, उपयोग, वेदन आणि समुद्धात इ. विषयांचे सुंदर निरूपण केलेले आहे.
। प्रज्ञापना एकप्रकारे ज्ञानविज्ञानाच्या कोशच आहे. साहित्य, धर्म, दर्शन इतिहास आणि भूगोलाचे अनेक महत्त्वपूर्ण उल्लेख ह्यामध्ये उपलब्ध होतात.
ह्या उपांगामध्ये साडेपंचवीस आर्य देशाचा उल्लेख आहे. मगध, अंग बेग इ. पंचवीस देशांना पूर्ण देश आणि केकय (श्वेतिका) याला अर्धा आर्यदेश मानले आहे. ह्यात कर्म आर्य, शिल्प आर्य, भाषा आर्य या रूपात आर्यभेदाचा उल्लेख केला आहे हणज ज शिल्पआर्य, भाषा आर्य इत्यादींमध्ये प्रविण आणि उत्कृष्ट असतील त्यांना