________________
आहे. ह्याची 'समवसरण' आणि 'उपपात' नावाची दोन अध्ययने आहेत. देवता आणि नारकांच्या जन्म व च्यवनाचे ह्या उपांगामध्ये वर्णन आहे. म्हणून ह्याचे नाव 'औपपतिक' हे विषयानुरूप आहे.
ह्यात राजनैतिक, सामाजिक आणि नागरीकतथ्याची चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर धार्मिक, दार्शनिक आणि सांस्कृतिक तथ्याचे सुद्धा सुंदर प्रतिपादन केलेले आहे. भगवान महावीरांच्या शरीर संपदेचे आणि समवसरणाचे जितके विस्तृत आणि सुंदर विश्लेषण येथे केलेले आहे तितके दुसरीकडे कोठेच उपलब्ध होत नसल्याचे हा आगम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
चंपा नगरीचे वर्णन सर्वप्रथम ह्या आगमामध्ये केलेले आहे. चैत्य, राजा राणी इत्यादींचे विस्तृत विवेचन येथे आहे. ह्यात कित्येक धर्मसंप्रदायांचा सुद्धा उल्लेख मिळतो. हा ब्राह्मण आणि श्रमण यांच्यामधला संप्रदाय होता ज्यांना 'तापस' सुद्धा म्हटले जात होते. भारत वर्षात भिन्न भिन्न धर्मसंप्रदायांच्या उत्पत्ती आणि विकासाच्या विश्लेषणाच्या दृष्टीने ह्याचे अध्ययन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ह्याविषयी अजून खोलवर अभ्यास झालेला नाही. ह्यात अजीवकांचे सुद्धा वर्णन आहे, जे मंखली गोशालकाचे अनुयायी होते.
_ (रायप्पसेणिय) राजप्रश्नीय सूत्र - हे द्वितीय उपांगसूत्र आहे. 'राजप्रश्नीय' शब्दाचा अर्थ असा आहे की राजाने केलेल्या प्रश्नाचे वर्णन ज्यात आलेले आहे ते. ह्याचा अर्थ असा आहे की, ह्या सूत्रात मुख्यत्वाने 'राजाप्रदेशी' कडून केलेले प्रश्न आहेत, जो अनात्मवादी होता. तसेच कुमार केशीश्रमणाने दिलेले उत्तर असे ह्याचे विशेष रूपात वर्णन आहे. हे वर्णन आत्म्याच्या अजर, अमर, शाश्वत स्वरूप, स्वर्ग, नरक इत्यादीचे स्वरूप समजण्यासाठी हे प्रश्नोत्तर फारच उपयोगी आहे.
ह्याचे दोन विभाग आहेत. प्रथम विभागामध्ये सूर्याभदेव भगवान महावीरांच्या समोर उपस्थित होऊन विविध प्रकराच्या नाटकाची रचना करतो. दुसऱ्या विभागामध्ये राजप्रदेशी' आणि 'पार्श्वपत्य स्वामी केशीश्रमण' यांचे संवाद आहेत.
जीवाजीवाभिगम सूत्र - हे तृतीय उपांगसूत्र आहे. जीव, अजीव आणि अभिगम या तीन शब्दांच्या मिश्रणाने 'जीवाजीवाभिगम' शब्द बनलेला आहे. जीव म्हणजे 'आत्मा, अजीव म्हणजे 'पुद्गल' इत्यादी आणि अभिगम म्हणजे 'ज्ञान' ह्यामधून जीवतत्त्व आणि अजीवतत्त्वाचे विशेषरूपाने ज्ञान मिळू शकते. ह्या दोन्ही तत्त्वांमधून