________________
Kolaminamaina
२०. बारा उपांगांचा संक्षिप्त परिचय जैन आगम साहित्यामध्ये अकरा अंगांप्रमाणे बारा उपांगांचाही समावेश होतो. मांग शब्दाचा प्रयोग आगमात मिळत नाही. नंदीसूत्रामध्ये आगभग्रंथांचे वर्गीकरण पाप्त होते. तेथे 'अंगबाह्य' आणि 'अंगप्रविष्ट' च्या रूपात आगमांना दोन रूपात विभागलेले आहे. 'उपांग' शब्दाचा प्रयोग केव्हापासून सुरू झाला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु 'आचार्य उमास्वाती' विरचित 'तत्त्वार्थ भाषा'मध्ये अंग आणि उपांग शब्दांचा प्रयोग केलेला आढळतो. त्यात उपांग शब्दाचा अर्थ 'अंगबाह्य आगम' असा आहे. उत्तरकालीन आचार्य सुद्धा उपांगाचा असाच अर्थ करतात.
आचार्य श्री देवेंद्रमुनी महाराजांनी बाराव्या शताब्दीच्या पूर्वी झालेले आचार्य श्रीचंद आणि तेराव्या शताब्दीच्या उत्तरार्धात आणि चौदाव्या शताब्दीच्या प्रथम चरणात झालेल्या आचार्य जिनप्रभांचा उल्लेख करताना लिहिले आहे की, ह्यांना अंगबाह्याला उपांगांच्या स्वरूपात स्वीकारले.३६
'उपांग' शब्द 'अंग' शब्दाच्या पूर्वी 'उप' हा उपसर्ग लागून बनतो. 'उप' उपसर्ग 'समीपता', 'जवळ' या अर्थाने प्रचलित आहे. त्याचा मथितार्थ असा आहे . की जो अंगाच्या जवळ असतो किंवा जे विषय विवेचनाच्या दृष्टीने अंगाबरोबर जुळलेले असतात ते उपांग होय.
जैन आणि इतर साहित्यामध्ये अंग आणि उपांगांचा अभिप्राय सारखा नाही. केवळ शाब्दिक साम्य आहे. कारण जैन आगमाची जी उपांगे आहेत त्याचे विषय जरी अंगांच्या विषयाशी जुळत नसले तरी अंग आणि उपांगांच्या विषयांमधील जैन धर्माचे सिद्धांत आणि आचार याविषयी एकमत किंवा साम्य आहे. परंतु उपांगांचा तीर्थकर वाणीबरोबर सरळ संबंध नसतो. ते स्थविर रचित आहेत.
बारा उपांगांची नावे -
१) औपपातिक २) राजप्रश्नीय ३) जीवाजीवाभिगम ४) प्रज्ञापना १) जम्बुद्वीपप्रज्ञप्ति ६) सूर्यप्रज्ञप्ति ७) चंद्रपज्ञप्ति ८) निरयावलिया किंवा कल्पिका ४) कल्पावतंसिका १०) पुष्पिका ११) पुष्पचूला १२) वृष्णिदशा ही बारा उपांगे आहेत.
iddai
s
Shi
Chu05Odi
औपपातिक सूत्र - हे जैन वाङ्मयाचे प्रथम उपांग सूत्र आहे. 'उपपात'चा अर्थ 'जन्म घेणे' अथवा 'प्रकट होणे' असा होतो. त्यापासून औपपातिक शब्द बनला