________________
(६१)
नाही. चंद्रप्रज्ञप्ति आणि सूर्यप्रज्ञप्ति यांच्याबाबत सुद्धा हाच प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे अजून समाधान होऊ शकलेले नाही. कारण आगमांवर दीर्घ काळाचा प्रभाव अवश्य पडला असावा. तरी जी सामग्री प्राप्त आहे ती महावीरांच्या सिद्धांताला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
चार मूळ सूत्र - तेराव्या शताब्दीपर्यंत मूळसूत्र असा विभाग झाला नव्हता. आचार्य श्री प्रभाचंद्र यांनी 'प्रभावक' चरित्रामध्ये सर्व प्रथम अंग, उपांग, मूळ, छेद असे विभाग केलेले मिळतात. त्यानंतर उपाध्याय समयसुंदरजी यांनी 'समाचारी शतक' यामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. यावरून असेच कळते की, 'मूळसूत्र' विभागाची सुरुवात तेराव्या शताब्दीच्या उत्तरार्धात झाली.
ह्या आगमामध्ये मुख्यरूपाने श्रमणांच्या आचारासंबंधी मूळगुण, महाव्रत, समिती, गुप्ती इत्यादींचे निरूपण केलेले आहे. आणि जे श्रमण जीवनचर्येमध्ये मूळरूपाने सहायक होतात, ज्या आगमांचे अध्ययन श्रमणासाठी सर्वप्रथम अपेक्षित आहे त्याला 'मूळ सूत्र' म्हणतात.
पूर्वी आगमाचे अध्ययन आचारागापासून सुरू होत असे. परंतु जेव्हा आचार्य शयंभव यांनी दशवैकालिक सूत्राची रचना केली तेव्हापासून सर्वप्रथम दशवैकालिकाचे / अध्ययन करण्याची परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर उत्तराध्ययन सूत्र इ. शिकविले जाते ३८
स्थानकवासी व तेरापंथी परंपरेमध्ये उत्तराध्ययन, दशवैकालिक, नंदीसूत्र आणि अनुयोगद्वार यांना मूळ सूत्र मानले गेले.
उत्तराध्ययन सूत्र - हे सर्वमान्य प्रथम मूळसूत्र आहे. काव्याप्रमाणे ह्यातही उपमा, दृष्टांत, उत्प्रेक्षा, रूपक इ. अलंकारांचा प्रयोग झालेला आहे. काव्यात्मक शैलीमध्ये संवाद आणि कथोपकथनातून वैराग्य, तितिक्षा, धृती, समता आणि संयत आचरणाचा उपदेश केला आहे.
सुप्रसिद्ध पाश्चात्य विद्वान डॉ. विंटरनीज यांनी ह्या आगमला 'श्रमणकाव्याची' संज्ञा दिली आहे.
आचार्य
• भद्रबाहू यांनी ह्यावर नियुक्तीची रचना केली आहे आणि जिनदासगणी महत्तर यांनी ह्यावर चूर्णी लिहिलेली आहे.
विषयाची विविधता सुरेखपणे प्रतिपादन केलेली असल्याने याचे आगम