________________
(५१)
तपस्या करून अनुत्तर विमानात उत्पन्न झाले. तपस्वींच्या जीवनाबरोबरच महावीरकालीन सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचेसुद्धा दर्शन ह्यात असल्याने हे अंगसूत्र महत्त्वाचे आहे.
प्रश्नव्याकरण सूत्र - हे दहावे अंगसूत्र आहे. ह्यात दोन श्रुतस्कंध आहेत. पहिले श्रुतस्कंध 'आश्रवद्वार' आणि दुसरे श्रुतस्कंध 'संवरद्वार' आहे. दोन्ही श्रुतस्कंधात पाच-पाच अध्ययने आहेत. हिंसा, असत्य, अदत्त, अब्रह्मचर्य आणि परिग्रह हे पाच आश्रवद्वार आहेत, ज्यामुळे आत्म्यात अशुभ कर्मांचे आगमन होत राहते. ह्याचे पहिल्या श्रुतस्कंधात विस्तृत वर्णन आहे.
___ अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांच्याद्वारे आश्रवाचा निरोध होतो. हे संवररूप आहेत. यांचे दुसऱ्या श्रुतस्कंधात विस्ताराने विवेचन केलेले आहे.
प्रश्नव्याकरणासंबंधी एक प्रश्न आहे. स्थानांग सूत्राच्या दहाव्या अध्ययनात जेथे दहा संख्यात्मक पदार्थांचे विवेचन आहे तेथे प्रश्नव्याकरणाच्या दहा अध्ययनांचा उल्लेख आलेला आहे - १) उपमा, २) संख्या ३) ऋषीभाषित ४) आचार्यभाषित ५) महावीर भाषित ६) क्षौमक प्रश्न ७) कोमल प्रश्न ८) आदर्शप्रश्न ९) अंगुष्ठप्रश्न १०) बाहुप्रश्न.
समवायांग जे संख्यामूलक आगम आहे. त्यात असा उल्लेख आहे. की प्रश्नव्याकरणामध्ये एकशे आठ प्रश्न, एकशे आठ अप्रश्न, एकशे आठ प्रश्नाप्रश्न आहेत. ते मंत्रविद्या, अंगुष्ठप्रश्न, बाहुप्रश्न, दर्पणप्रश्न इत्यादी विद्येबरोबर संबंधित आहेत. ह्या सूत्राची पंचेचाळीस अध्ययने आहेत.
नंदीसूत्रात सुद्धा जवळ जवळ अशाच प्रकारचे वर्णन आहे. दिगंबर परंपरेच्या षटखंडागमाची टिका धवला इत्यादींमध्ये प्रश्नव्याकरणाची चर्चा आलेली आहे. त्यात सांगितले आहे की ह्या आगमात चार प्रकारच्या कथेचे वर्णन आहे - अक्षेपणी, विक्षेपणी, संवेदणी, निर्वेदणी.
उपरोक्त विषय ज्योतिष अथवा निमित्तशास्त्राबरोबर संबंधित आहेत. ज्याच्या आधारे विशिष्ट अभ्यासक तशा प्रश्नांचे उत्तर देत होते. प्रश्नव्याकरणांचे जे वर्तमान रूप आहे त्याचा ह्या विषयाबरोबर काहीच संबंध नाही. तरीही असे का झाले ? ह्याच कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही.
नवांगी टिकाकार 'आचार्य अभयदेव सूरिंनी' ह्याविषयी आपल्या वृत्तीमध्ये