________________
astitive
Faccisperd
काही चर्चा अवश्य केलेली आहे. त्याचा आशय हा आहे की प्रश्नव्याकरण यामध्ये जो विषय होता तो चमत्कारिक विद्येशी संबंधित होता. कोणत्याही अनधिकारी किंवा अयोग्य व्यक्तींच्या हातात आले तर त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ह्या विद्यविद्वानांनी काढून टाकल्या, आणि त्याठिकाणी साधक जीवनोपयोगी आश्रवद्वार आणि संवरद्वार विषयांना स्थापन केले.३४ प्रश्नव्याकरणाचे एक टिकाकार आचार्य ज्ञानविमल होते त्यांनी सद्धा अशाच प्रकारचा संकेत केलेला आहे. ह्या दोन्ही टिकाकारांच्या वर्णनाने प्रश्नाचे खरे समाधान होत नाही. परंपरेने चालणाऱ्या आगमग्रंथांतीत विद्यांना अनिष्टाच्या शंकेने कोणीतरी काढून टाकणे हे कदापि संभवत नाही. कारण आगमाच्या एका अक्षराला जरी बदलेले तरी ते कार्य दोषयुक्त मानले जाते तर संपूर्ण पाठ काढून दुसरे पाठ त्या जागी घालणे हे कार्य निंदनीयच आहे.
आचार्य श्री देवेंद्रमुनी म. सा. यांनी प्रश्नव्याकरणसूत्राच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले आहे की वर्तमान प्रश्नव्याकरण भगवान महावीरांच्या प्रश्नाच्या उत्तराचा आंशिक भाग आहे.३५
विपाक सूत्र - प्रस्तुत आगम द्वादशांगीचे अकरावे अंगसूत्र आहे. ह्या आगमात शुभाशुभ कर्माच्या विपाकाचे सुखदुःखात्मक परिणाम आणि फळाचे वर्णन केले. म्हणून ह्याचे नाव विपाकसूत्र आहे. अशुभ प्रवृत्तीचा परिणाम पाप विपाक आहे. आणि शुभ प्रवृत्तीचा परिणाम पुण्यविपाक आहे. ह्यात दोन श्रुतस्कंध आणि वीस अध्ययने आहेत.
'कर्मसिद्धांत' हा जैन दर्शनाचा मुख्य सिद्धांत आहे. त्याचे दार्शनिक विश्लेषण उदाहरणांद्वारे ह्या आगमात केलेले आहे.
पहिल्या विभागात दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तिंच्या जीवनाचे वर्णन आहे. काही हिंसा, चोरी, अब्रह्मचर्य इ. दुर्भावनेने भयंकर अपराध करतात. आपल्या दुष्कर्मामुळे त्यांना अनेक यातना भोगाव्या लागतात. ह्यात पापाचे कटू परिणाम दाखवून जगाला संदेश दिला आहे की पापाचे परिणाम समजून घेऊन त्यांचा त्याग करा.
विपाकसूत्राच्या दुसऱ्या विभागात सत्कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाचे पणन आहे. सुबाहुकुमार इत्यादी राजकुमारांनी पूर्वभवामध्ये पवित्र आणि उदार भावनेने महान तपस्वी मुनींना आहार दान दिले होते. त्यामुळे अपार सुख, ऐश्वर्य, रूप इत्यादी
KATTATREntri