________________
काच श्रमण धर्माचा पाया प्रतिष्ठित होईल. त्या दृष्टीने श्रावकांसाठी हे आगम मार्गदर्शन करणारे असल्याने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ह्यात श्रावकाने केलेल्या त्यागाचे, श्रावकव्रताचे, श्रुतग्रहण, तप, शीलव्रत, अणुव्रत, गुणव्रत, प्रतिमा, उपसर्ग, संलेखना, पाटोपगमन, देवलोकगमन, पुन्हा मनुष्यलोकात उत्तम कुळाची प्राप्ती, सम्यकत्व धर्माची प्राप्ती आणि अंतक्रिया इत्यादींचे वर्णन आलेले आहे.
ह्याच्या सहाव्या अध्ययनात कुंडकौलिक श्रमणोपासकाचे वर्णन आहे. तेथे मंखलिपुत्र गोशालकाची धर्मप्रज्ञप्ति आणि महावीरांच्या धर्मप्रज्ञप्तिंचे वर्णन आहे. कुंडकौलिकाने दोघांची तुलना करून महावीरांच्या धर्माला स्वीकारले.
सातव्या अध्ययनात शकडालपुत्र कुंभकाराचे जीवनचरित्र आहे. तो गोशालकाचा अनुयायी होता नंतर गोशालकाच्या 'आजीवक' संप्रदायाचा त्याग करून महावीरांच्या सिद्धांताला स्वीकारले.
भगवतीसूत्र व उपासकदशांग सूत्र ह्या दोन आगमातच गोशालकाची चर्चा आहे. ती, भगवान महावीर कालिन धार्मिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्यांना पठनीय
आहे.
___ अंतकृतदशांग सूत्र - हे आठवे अंगसूत्र आहे. 'अंतकृतदशा' शब्दाचा अर्थ 'अंत करणारे' असा आहे. ज्यांनी जन्ममरणाचा, अंत केला आणि केवलज्ञान प्राप्त करून, मोक्षाप्राप्त केला त्यांना 'अंतकृत केवली' म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये संसाराचा अंत करणाऱ्या व्यक्तींचे वर्णन केलेले आहे ते 'अंतकृतदशांगसूत्र' होय. ह्यात एक श्रुतस्कंध, आठ वर्ग आणि नव्वद अध्ययने आहेत. हा संपूर्ण आगम भौतिकतेवर आध्यात्मिक विजयाचा संदेश देतो. सर्वत्र तप आणि ध्यान यांचेच वर्णन आहे. ह्यात ज्या कथा आहेत त्या जवळ जवळ सारख्याच शैलीत आहेत. प्रत्येक कथेच्या काही भागांचे वर्णन करून राहिलेला सर्व भाग पूर्ववत म्हणजे पूर्वी प्रमाणेच घेण्याचा संकेत केलेला आहे.
अनुत्तरोपपातिक दशासूत्र - प्रस्तुत आगम द्वादशांगीचे नववे अंगसूत्र आहे. ह्या आगमात एक श्रुतस्कंध आणि तीन वर्ग आहेत. ह्या आगमात अशा साधकांचे वर्णन आहे ज्यांनी अनुत्तर विमानात जन्म घेतला आणि नंतर मनुष्यजन्म घेऊन मोक्ष प्राप्त केला.
nctikariARE
u
भगवान महावीरकालीन उग्र तपस्वींचे ह्यात वर्णन आहे. ते सर्व तपस्वी