________________
(४९)
मंगलाचरणाचा विशेष पाठ मिळत नाही शेवटी 'श्रुत' देवाचे सुद्धा स्मरण केलेले आहे. महामंत्र 'नवकार' सर्व प्रथम ह्या अंगसूत्रातच लिपीबद्ध मिळतो. ह्याची रचना बौद्ध ‘सुत्तपिटका' सारखी आहे. सुत्तपिटकामध्ये सुद्धा महात्मा बुद्धांना विचारलेले प्रश्न व त्याचे उत्तर संग्रहित आहे. 'गोशालक' जो भगवान महावीरांचा शिष्य होता. परंतु नंतर तो महावीरांच्या सिद्धांताचा विरोधी झाला त्याचे विशेष रूपात वर्णन आहे. भगवान महावीरांकडून गोशालकाला तेजोलेश्येच्या उपद्रवापासून वाचविले जाणे, त्याचे भगवंतांच्या संघातून वेगळे होणे, नियतिवाद सिद्धांताचा प्रचार करणे, भगवान महावीरांवर तेजोलेशी सोडणे, तेजोलेश्या परत फिरून त्याच्या जवळच जाणे व त्याचाच मृत्यू होणे ह्याचे संपूर्ण वर्णन ह्या आगमाच्या पंधराव्या शतकात आहे.
ज्ञाताधर्मकथा हा धर्मकथा प्रधान सहावा अंगसूत्र आहे. ह्याचे दोन श्रुतस्कंध आहेत प्रथम श्रुतस्कंधामध्ये १९ अध्ययने आहेत आणि दुसऱ्या श्रुतस्कंधामध्ये १० वर्ग आहेत.
-
पहिल्या श्रुतस्कंधात दृष्टांताच्या आधार अहिंसा, श्रद्धा, इंद्रियविजय इत्यादी अध्यात्मिक तत्त्वाचे सोप्या शैलीत निरूपण केलेले आहे.
दुसऱ्या श्रुतस्कंधात वर्णिलेल्या अधिकांश कुमारीका भगवान पार्श्वनाथांच्या शासनामध्ये दीक्षा घेऊन उत्तरगुणांची भावना केल्याने देवांच्या रूपात उत्पन्न झाल्या परंतु त्यांची विशेषता ही आहे की देव्यांच्या रूपात सुद्धा त्यांचे नाव त्यांच्या मनुष्यजन्मातीलच होते.
उपासकदशांक सूत्र - हे आगम द्वादशांगीचे सातवे अंग सूत्र आहे. ह्यात भगवान महावीर कालिन दहा उपासकांचे पवित्र चरित्र आहे. उपासक शब्द जैन गृहस्थांसाठी वापरला जातो. 'दशा' शब्द दहा संख्येचा वाचक आहे. प्रस्तुत आगमात दहा उपासक आणि दहा अध्ययने असल्याने प्रस्तुत आगमाचे नाव उपासक दशांग आहे. त्यात एक श्रुतस्कंध आहे.
अन्य अंगसूत्रात श्रमण- श्रमणिच्या आचारांचे वर्णन आहे. परंतु प्रस्तुत आगमात श्रावकधर्माचे वर्णन आहे.
श्रमण, श्रमणी श्रावक, श्राविका हे तीर्थांचे चार स्तंभ आहेत. एका दृष्टीने श्रावक-श्राविकाच, श्रमण श्रमणिच्या आस्तित्वाचे आधार आहेत. श्रावक धर्माचा पाया जितका मजबूत असेल, सत्य, शील, सदाचार, न्याय नीतीवर आधारलेला असेल