________________
(४६)
आचारांगाचाच उपदेश देतात. आणि भविष्यकाळात जे तीर्थंकर होतील ते सर्वप्रथम आचारांगाचाच उपदेश देतील. त्यानंतर दुसऱ्या अंगाचा उपदेश दिला जातो गणधर ३३ ह्या क्रमानुसारच द्वादशांगीचे गुंफण करतात.
आचारांगाच्या महानतेचे मुख्य कारण हे सुद्धा आहे की हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. जर्मनीचे डॉ. हर्मन जेकोबी यांनी आपल्या जीवनाचा अधिक काळ प्राकृतभाषा, जैनागम आणि साहित्याच्या गहन अध्ययन यामध्येच घालविला. त्यांनी असे लिहिले आहे की, आचारांग सूत्रात प्राकृतचा जो प्रयोग मिळतो तो प्राचीनतम प्राकृतचे रूप आहे. आचारांग सूत्राला त्यांनी फार महत्त्वपूर्ण मानले आहे.
आचारांगामध्ये असलेले महावीरांच्या जीवनाचे आणि तपाचे वर्णन इतिहासकारांसाठी खूपच उपयोगी आणि प्रामाणिक असे सिद्ध झालेले आहे. ह्याच्या आधारावर आजच्या युगात जैन धर्म आणि महावीरांची ऐतिहासिकता व प्रामाणिकता प्रतिष्ठित झाली आहे. आचारांगसूत्राचे गूढ रहस्य स्पष्ट करण्यासाठी वेळोवेळी व्याख्या करणारे साहित्य निर्माण झालेले आहे. त्या व्याख्या साहित्याला पाच भागात विभक्त केले आहे- १) निर्युक्ति २) भाष्य ३) चूर्णी ४) संस्कृतटीका ५) लोकभाषेत लिहिलेले व्याख्यासाहित्य.
दर्शन अध्यात्म व आचाराची त्रिपुटी म्हणजे आचारांग सूत्र म्हणूनच आगम ग्रंथात सर्वप्रथम स्थान भूषवित आहे.
सूत्रकृतांग सूत्र - हे द्वितीय अंगशास्त्र आहे. ह्याचे दोन श्रुतस्कंध आहेत. पहिल्या श्रुतस्कंधात सोळा व दुसऱ्या श्रुतस्कंधात सात अध्ययने आहेत. दार्शनिक साहित्याच्या ऐतिहासिक दृष्टीने ह्यांचे स्थान आचारांगापेक्षाही महत्त्वाचे आहे. ह्यात महावीरकालीन मतमतांतराचे वर्णन आहे.
सूत्रकृतांग सूत्रात ज्या मतांचा उल्लेख केलेले आहे त्याचा संबंध आचार आणि तत्त्ववाद म्हणजे दर्शनशास्त्राबरोबर आहे. ह्या मतांचे वर्णन विशिष्ट पद्धतीने केलेले आहे. ज्यात पूर्व पक्षाचे मत मांडून नंतर त्याचे खंडन केले आहे. बौद्ध परंपरेच्या अभिधम्म पिटकाची रचनाशैली अशा प्रकारची आहे.
Adda
नवीनच दीक्षा घेतलेल्या श्रमणांना संयमात स्थिर ठेवण्यासाठी, त्यांचा आचारपक्ष शुद्ध करण्यासाठी ह्या अंगशास्त्रात जैन सिद्धांताचे विस्तृत वर्णन केलेले आहे. प्राचीन बौद्धिक विचार-दर्शन, जैन-अजैन दर्शन समजण्याच्या दृष्टीने सुद्धा हे आगम