________________
(४५)
Ritice
महावीरांच्या नंतरचे साहित्य - ज्यात महावीरांचे प्रवचन अथवा सिद्धांत प्रस्तत केले आहेत हे महावीरांच्या नंतरचे साहित्य होय. महावीरांनी आपल्या धार्मिक व दार्शनिक सिद्धांताचे संकलन केले नाही की त्याला साहित्यिकरूप दिले नाही परंतु त्यांच्या प्रमुख शिष्यांनी तसेच अन्य आचार्यांनी त्यांच्या उपदेशाचे संकलन करून त्याला साहित्यिक रूप दिले आणि त्या आधारावरच त्या साहित्याला दोन भागांमध्ये विभागले गेले.
१) अंग प्रविष्ट - ज्याची रचना (संकलन) गणधर म्हणजे महावीरांच्या प्रमुख शिष्यांनी केली.
२) अंग बाह्य - ज्याची रचना आचार्यांनी केली.
आगम शब्द 'आ' उपसर्ग आणि 'गम्' धातूने निर्मित आहे. 'आ' उपसर्गाचा अर्थ 'समंतात' म्हणजे पूर्ण आणि 'गम्' धातूचा अर्थगती प्राप्ती आहे. वस्तुतत्वाचे पूर्णपणे ज्ञान होते ते आगम आहे.३१
___ जैन आगम साहित्याचे अंग, उपांग, मूळ, छेद प्रकीर्णक इत्यादी विभिन्न भाग आहेत. ज्यात जैन विचारधारा दार्शनिक, धार्मिक, नैतिक इ. भिन्न रूपात प्रवाहीत होते. जैनाचार संपूर्ण जैन साहित्यात पल्लवित आणि पुष्पित होतात. परंतु मूळ स्रोत अंगसूत्र आहे, त्याचे संक्षिप्त विवेचन पुढे केले जात आहे.
१९. आगम अंगांचे संक्षिप्त विश्लेषण आचारांग सूत्र - आचारांग सूत्राचे अंगसाहित्यात अग्रस्थान आहे. कारण आध्यात्मिक साधना आणि संघ-व्यवस्थेसाठी आचार-व्यवस्थेची अत्यंत आवश्यकता आहे. आचारांगामध्ये श्रमण जीवनाच्या साधनेचे मार्मिक विवेचन आहे. आचारांगनिर्युक्तीमध्ये आचार्य भद्रबाहूंनी स्पष्ट सांगितले आहे की, "मुक्तीचे निर्व्याध सुख प्राप्त करण्याचे मूळ आचारातच आहे, अंगशास्त्राचे सार, तत्त्व आचारामध्येच आहे.३२ मोक्षाचे प्रत्यक्ष कारण असल्याने आचार संपूर्ण आगमांची आधारशिला आहे. आचारांग सूत्राच्या प्रथम श्रुतस्कंधात नऊ आणि द्वितीय श्रुतस्कंधात सोळा अध्याय आहेत.
- आचारांग चूर्णी आणि वृत्तीमध्ये सांगितलेले आहे की, "भूतकाळात जे ताथकर होऊन गेले त्या सर्वांनी सर्वप्रथम आचारांग सूत्राचाच उपदेश दिला. वर्तमानकाळात जे तीर्थंकर 'महाविदेह' क्षेत्रात आहेत ते सुद्धा सर्वजण प्रथम