________________
(४७)
महत्त्वपूर्ण आहे.
ह्या आगमात जीव, अजीव, लोक, अलोक, पुण्य, पाप, आग्नव, संवर, निर्जरा, बंध आणि मोक्षाचे विस्तृत वर्णन आहे. भगवान महावीरांच्या पूर्वीचे आणि महावीर कालीन भारतीय प्रमुख दार्शनिक सिद्धांताचा विचार जसे पंचभूतवाद एकात्मवाद, तदजीवतदशरीरवाद, क्षणिकवाद, अक्रियावाद इ. साठी हा ग्रंथ फार उपयोगी आहे.
भाषेच्या दृष्टीने आचारांगाप्रमाणे ह्यातसुद्धा अर्धमागधी प्राकृतच्या प्राचीन रूपाचा प्रयोग केलेला आहे. ह्या आधारावर डॉ. हर्मन जेकोबी इत्यादी विद्वानांनी ह्या आगमाला प्राचीन मानले आहे.
स्थानांग सूत्र - आगम द्वादशांगामध्ये ह्याचे तृतीय स्थान आहे. 'स्थानांग' शब्द 'स्थान' आणि 'अंग' ह्या दोन शब्दांच्या संयोगाने बनला आहे. ह्यात दहा स्थान आहेत. इथे 'स्थान' या शब्दाचा अर्थ 'अध्ययन' असा आहे. ह्या आगमात संख्येच्या क्रमाने पदार्थ आणि तत्त्वांचा उल्लेख आहे उपदेश अथवा सिद्धांताचे विवेचन नाही.
। प्रत्येक स्थानाचा आधार तेथे उल्लेखिलेल्या विषयांची संख्या आहे. जसे संसारात जे पदार्थ अथवा तत्त्व आहेत ते पहिल्या स्थानावर आहेत. तसेच दोन, तीन, चार असे दहापर्यंत वर्णन आहे. दहा स्थानामध्ये एकूण ७८३ सूत्रे आहेत.
ह्या सूत्रात एक श्रुतस्कंध आणि दहा अध्ययने आहेत. ह्याची रचना बौद्धांच्या 'अंगुत्तरनिकाय' सारखी आहे. पदार्थाचे गुण, द्रव्य, क्षेत्र, काल आणि पर्याय इत्यादींच्या उल्लेख यात मिळतो. त्याचप्रमाणे पर्वत, नदी, समुद्र, सूर्य, भवन, विमान, निधी, पुरुषांचे प्रकार, स्वर इत्यादींचा संकेत प्राप्त होतो.
आत्मा, पुद्गलज्ञान, नय-प्रमाण इत्यादी दार्शनिक विषयांना सुद्धा ह्यात समाविष्ट केले आहे. भगवान महावीरांच्या शासनकाळात झालेल्या सात विह्नवांचा उल्लेख सुद्धा ह्यात समाविष्ट आहे.
समवायांग सूत्र - हे चतुर्थ अंगसूत्र आहे. स्थानांगाप्रमाणेच समवायांग सूत्राची कोश शैली 'अंगुत्तरनिकाय' सारखी आहे. ह्या आगमात एका सूत्राचा दुसऱ्या सूत्राशी संबंध अवश्य असला पाहिजे असे न समजता संख्यांच्या दृष्टीने जो विषय समोर आला त्याचे संकलन केलेले आहे. समवाय शब्दाचा अर्थ 'संग्रह' असा आहे.
_ समवायांगामध्ये एक पासून शंभर पर्यंतची संख्या असलेल्या पदार्थांचे वर्णन आहे आणि पुढे कोटी संख्यापर्यंत सुद्धा पदार्थांचे वर्णन आहे. स्थानांगापेक्षा