________________
(३८)
araswiree
नेहमी ब्राह्मणांना आपल्या कौटुंबिक पुरोहिताच्या स्थानी नियुक्त केले. जन्माच्यावेळी सर्व संस्कार करणाऱ्या पुरोहिताला अध्यक्ष रूपात त्यांनी स्वीकारले आणि शुभाशुभ प्रसंगात सुद्धा पुरोहिताकडूनच विधी करण्यासाठी सहकार्य घेतले. पुजा इत्यादींसाठी सुद्धा हे धर्माध्यक्ष रूपात असत. इतकेच नसून त्यांनी आपल्या प्रमुख चरित्रनायकांमध्ये हिंद देवता राम, कृष्ण इत्यादींसाठी सुद्धा काही स्थान सुरक्षित ठेवले.
जेव्हा संपूर्ण देशावर अत्याचाराचे वादळ आले तेव्हा जैन लोकांना हिंदू धर्माने सहज स्थान दिले. हिंदू धर्माने जैनांचे विशाल हृदयाने सहर्ष स्वागत केले.
असा घनिष्ट संबंध असल्याने विजेत्याला, जैनमत आणि हिंदुधर्मात फारसा फरक दिसून येत नाही.२५
भाषा आणि सहित्याच्या दृष्टीने सुद्धा जैन धर्मात समन्वय प्रकट होतो. जैन विद्वानांनी आणि संतांनी प्राकृत आणि संस्कृत भाषेलाच नव्हे तर सर्व भाषांचा स्वीकार करून त्यांना उचित मान दिला.
भगवान महावीरांनी ईश्वराच्या रूपाला एकाधिकार क्षेत्रात न मानता सर्व प्राण्यांच्या आत्म्यामध्ये परमात्म्याचे स्वरूप पाहिले. त्यामुळे सर्व जीव साधनापथावर पुढे जाऊ शकतात. साधनापथाच्या बंधनाला महावीरांनी सोडून टाकले. मोक्षप्राप्तीचा अधिकार स्त्री, पुरुष, उच्च-नीच, सर्वांना समान आहे आणि तो पुरुषार्थाने प्राप्त होतो असा संदेश दिला. त्यांनी भाग्याला विशिष्ट स्थान न देता कर्माची प्रधानता स्वीकारली.
भगवान महावीरांनी संसाराचे स्वरूप दुःखमय दाखवून संयम आणि वीतरागावर भर दिला. याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी जगात निराशावादाची भावना पसरवून कलाप्रेम कुंठित केले, तर संसार दुःखमय आहे असे दाखविण्यामागे हाच उद्देश होता की जीवात्म्याने अखंड सुख आणि शाश्वत आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनावे. जर केवळ दुःखमय संसाराचे स्वरूप दाखवूनच थांबले असते खऱ्या सुखाचा मार्ग दाखविला नसता तर आम्ही याला निराशावाद म्हटले असते. परंतु महावीरांनी तर मानवाला महामानव, आत्म्याला परमात्मा, जीवाला शिव, नराला नारायण बनविणाऱ्या शक्तीला प्रकट केले.
१४. भगवान महावीरांचा उपदेश आणि श्रुत परंपरा
भगवान महावीरांनी भवसागरातील जीवांच्या उद्बोधनार्थ उपदेश दिला. त्यात धार्मिक तत्त्व आणि आचारांचे विवेचन केले. गणधरांनी त्याला सूत्ररूपात संकलित
H
MEनाही