________________
(३७)
SHellika
त्यांना स्थिर केले. त्यांना तत्त्वज्ञानाचे अमृत पाजून मोक्ष प्राप्तीचे निमित्त बनली.
अनेकान्त दर्शन - भगवान महावीरांनी समन्वय आणि एकतेच्या भावनेला प्रबळ करण्यासाठी अनेकान्त दर्शनाचा उपदेश दिला. कोणत्याही गोष्टीला अथवा सिद्धांताला एकाच दृष्टिकोनातून न पाहणे, अनेकांतवाद होय. भगवान महावीरांनी सांगितले की, 'एक मीच सत्य आहे असा विचार करू नका पण मी जे सांगतो ते सुद्धा सत्य असेल, दुसरे जे सांगतात ते सुद्धा सत्य असेल. त्यामुळे शांत चित्ताने व्यक्तीच्या दृष्टिकोनाचा विचार करा.'
। आज विश्वामध्ये जी ओढाताण आणि द्वंद्व आहे ती दृष्टिकोन न समजल्यामुळे आहे. जर भगवान महावीरांच्या अनेकान्त सिद्धांताचे संपूर्ण राष्ट्राने आणि व्यक्तिव्यक्तीने चिंतन केले तर कलहाचे मूळच नष्ट होईल. संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि सुदृढ बनविण्यासाठी जैन धर्माची ही अत्यंत महत्त्वपूर्ण देणगी आहे.
सदाचाराच्या दृष्टीने भ. महावीरांनी श्रावकांसाठी गृहस्थ धर्म आणि श्रमणांसाठी मुनी धर्माचा उपदेश दिला. प्रवृत्ती आणि निवृत्तीचे सामंजस्य स्थापित केले. ज्ञान आणि क्रिया, स्वाध्याय आणि सामाजिक संतुलन म्हणूनच आवश्यक मानलेले आहे. जैन धर्म एकांत निवृत्तिमूलक नाही, परंतु प्रवृत्तीमूलक सुद्धा आहे असे स्पष्ट केले.
___ भगवान महावीरांनी संप्रदायवाद, जातिवाद, प्रान्तीयवाद इ. सगळ्या वादांना बाधित करून “वसुधैव कुटुम्बकम्' अशी राष्ट्रभावना आणि अनेकात भावनेचा उदारतेने आणि आदराने स्वीकार केला.
___ प्रत्येक धर्माच्या विकासाचे एखादे विशिष्ट क्षेत्र असते परंतु जैन धर्माची अशी कोणतीही क्षेत्रमर्यादा नाही. तो संपूर्ण विश्वात पसरला आहे. 'विश्वची माझे घर' ही उदात्त भावना जैन धर्माच्या अनेकांत सिद्धांताला पुष्टी देते. म्हणूनच जैन लोक संख्येने जरी कमी असले, त्यांनी धर्मप्रचाराला विशेष महत्त्व दिलेले नसले तरी सुद्धा जैन मत आजही भारतात जिवंत आहे. ह्याच्या ऐतिहासिक तथ्याची व्याख्या करताना श्रीमती स्टीवेन्सनने 'द हार्ट ऑफ जैनिज्म' मध्ये सांगितले आहे की जैनमताचे स्वरूप असे होते की ज्यामुळे आवश्यकता पडल्यावर, आपल्या आवश्यक अंगाद्वारे भयंकर सकटाच्यावेळी आपले रक्षण करण्यात ते सक्षम होते. जैन मताचे अनुसरण करणाऱ्यांनी कधीही स्वतःला त्यावेळी प्रचलित असलेल्या मतापासून वेगळे ठेवले नाही. त्यांनी