________________
(३९)
केले जे आज आपल्याला आगमांच्या रूपात उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत भगवान महावीरांचा उपदेशच प्रमाणभूत मानला जातो.
'विशेषावश्यक' भाष्यामध्ये महावीरांच्या देशने संबंधी विशेषरूपाने चर्चा केली आहे. जिनभद्रगणि क्षमाश्रमण लिहितात की, तप, नियम आणि ज्ञानरूपी वृक्षावर आरूढ झालेले अनंतज्ञानसंपन्न केवलज्ञानी, जीवांना बोध देण्यासाठी ज्ञानपुष्पाची वृष्टी करतात. त्याला गणधर बुद्धीरूपी पटलात ग्रहण करतात. त्याचे प्रवचनाच्या रूपात ग्रथन करतात. गणधर तीक्ष्ण बुद्धियुक्त असल्याने आणि बीज बुद्धी इ. ऐश्वर्यसंपन्न असल्याने तीर्थकरांच्या वाणीला पुष्पवृष्टीच्या रूपात पूर्णपणे ग्रहण करून रंगीबेरंगी पुष्पमाळेप्रमाणे प्रवचनाच्या सूत्र माळेचे गुंफण करतात. पसरलेल्या फुलांना ग्रहण करणे खूप कठीण आहे. परंतु गुंफलेली माळ ग्रहण करणे सोपे असते ते कार्य गणधर सोपे करून देतात.२६
तीर्थंकर अर्थरूपात उपदेश देतात म्हणून अर्थागम, गणधर त्याच्या आधारावर सूत्राची रचना करतात. म्हणूनच सूत्रागम आणि ह्या दोन्हींच्या संमिलित रूपाला 'तदुभयागम' म्हणतात. अशाप्रकारे आगमाचे तीन भेद आहेत. गणधर श्रुतकेवली आणि आचार्यांनी ह्या श्रुतपरंपरेचे खूपच प्रयत्नपूर्वक संरक्षण केले आहे.
जवळजवळ दोन हजार पाचशेपेक्षा सुद्धा जास्त वर्षांपूर्वी जिज्ञासू साधक आपापल्या काळातल्या श्रुत साहित्याला आपल्या गुरूच्या मुखातून ऐकून आकलन करत होते. त्यांच्या कंठस्थ पाठांना पुन्हा पुन्हा स्मरण करून लक्षात ठेवत होते. कोठेही मात्रा, अनुस्वार, इत्यादी निरर्थकपणे समाविष्ट होऊ नये अथवा राहून जाऊ नये ह्याची पूर्णपणे दक्षता बाळगत होते कारण त्यावेळी आगमाच्या लेखनाची परंपरा नव्हती. सगळे ध्यानात ठेवणे आवश्यक मानले जात होते.
श्रुतपरंपरा - श्रवणाने जे ज्ञान प्राप्त झालेले असते त्याला 'श्रुत' म्हणतात.
अशाप्रकारे शुद्ध रीतीने संचित श्रुत संपत्ती गुरू आपल्या शिष्यांना, शिष्य पुन्हा आपल्या परंपरेतील शिष्यांना प्रदान करत होते. ही मौखिक श्रुत परंपरा भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर जवळजवळ हजारवर्षापर्यंत चालत राहिली.
१५. आगम संकलनाच्या तीन वाचना आगम संकलनाचा प्रथम प्रयत्न - भगवान महावीरांच्या निर्वाणाच्या १६० वर्षानंतर चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात मगध देशामध्ये भयंकर दुष्काळ पडला, त्यामुळे