________________
विक
(३८१)
आचार्य शुभचंद्रांनी अन्यत्वाच्या मूळ तत्त्वाची चर्चा केली आहे. ह्या जगात दोनच मुख्य तत्त्वे आहेत - शरीर आणि आत्मा. शरीराच्या माध्यमानेच सर्व संबंध उत्पन्न होतात. जेव्हा संबंधांबद्दल विचार करतो तेव्हा विचार येतो की, जेव्हा शरीरही वेगळे, अन्य आहे तर स्वजन, बंधुजन, पौद्गलिक संपत्ती आपली कशी होऊ शकते. 'स्व'त्व भावाला स्वतःमध्ये निश्चित करण्यासाठी 'पर'त्व भावाला सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
'पर' विनाशाला आमंत्रण देतो. ह्या गोष्टीला पुष्ट करण्यासाठी उपाध्याय विनयविजयजींनी अन्यत्वभावनेच्या प्रथम श्लोकामध्ये एक लोकोक्ति उद्धृत केली आहे"परः प्रविष्टः कुरुते विनाशं" घरात दुसऱ्याच्या प्रवेशाने विनाश होतो. ह्याचा भावार्थ हा आहे की, सज्जनाच्या वेशात जर दुर्जनाने घरात प्रवेश केला अथवा साधूच्या वेशात डाकू आला तर विनाश होतोच. ही बाह्य प्रवेशाची आणि विनाशाची गोष्ट आहे. परंतु शरीरात राहणारा ज्ञानाने समृद्ध आणि शुद्ध आत्म्यामध्ये घुसलेल्या कर्मरूपी परमाणूंनी किती कहर मांडला आहे. १७४
आत्मा महान शक्तियुक्त, ज्ञानाने प्रकाशमान आहे. परंतु हे कर्म परमाणू प्रवेश करून चैतन्याला अनेक प्रकारे नाच नाचवते. सांगतात ना 'काजी दुबले क्यो ? सारे गाव की चिंता.' मनुष्याला असे वाटते की मला हे करायचे आहे, ते करायचे आहे, माझ्याशिवाय कसे होईल? मी केले तरच काम होईल. अशाप्रकारच्या अहंकारात आणि ममत्वाच्या परतंत्रतेमध्ये स्वतःच्या हाताने स्वतःची दुर्दशा करत आहे. 'पर'ची चिंता, 'पर'च्या गोष्टी 'पर'साठी व्यूहरचना करतो आणि त्यात काही गडबड-घोटाळा झाला तर दुःखी कष्टी होतो. चक्रव्यूहामध्ये फसून जातो.
साधकाने विचार केला पाहिजे की मला 'स्व'चे चिंतन करायचे आहे. जे गुणरत्न माझ्या आत आहे, माझ्याबरोबर येणार आहे त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न सार्थक आहे. निरर्थकाची चिंता सोडून स्वतःच स्वतःच्या शाश्वत गुणांची ओळख करून घ्यायची
आहे.१७५
आत्म्याचे गुण रत्नांसारखे आहेत. त्यात एक नव्हे, दोन नव्हे तर अनंत गुण विद्यमान आहेत. पौद्गलिक पदार्थरूपी काचेच्या तुकड्याला पाहण्यात, त्याच्या ममत्वात आत्मगण रत्नांकडे कधी पाहिले नाही कारण काच आणि रत्नाच्या मूल्याला समजण्याचा कधी प्रयत्नच केला नाही.